Dailyhunt
सॅनिटायझर, मास्कच्या किंमती नियंत्रित करणार

सॅनिटायझर, मास्कच्या किंमती नियंत्रित करणार

प्रभात 5 years ago

मुंबई- मागणी वाढल्यानंतर मास्क आणि सॅनिटायझर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी नफेखोरी सुरु करुन मास्क आणि सॅनिटायझरचे दर प्रचंड वाढवले. आता हे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. याबाबत अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांशी चर्चा करून येत्या सात ते आठ दिवसात याबाबतचा आदेश काढला जाईल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्य सरकारने बाहेर फिरताना मास्क वापरणे बंधनकारक केल्याने तर मास्कची विक्री खूप वाढली आहे. त्यामुळे मास्क उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी मास्कची किंमत खूप वाढवली असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने मास्क आणि सॅनिटायझरच्या दरावर नियंत्रण आणण्याचं ठरवलं आहे.

यापूर्वी राज्य सरकारने रुग्णवाहिकांच्या दरावर, रुग्णालयातील दरांवर, कोरोनाच्या चाचणीच्या दरावर नियंत्रण आणलं आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat