लंडन - ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी एका अशा हेलमेटचा शोध लावला आहे जे हेल्मेट डोक्यावर परिधान केल्यानंतर स्मरणशक्तीचे संवर्धन केले जाते. म्हणजेच माणसाची स्मरणशक्ती कमी होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होण्याचे काम हे हेल्मेट करते.
ब्रिटनमधील ज्या डरहॅम येथील संशोधकांनी हे हेल्मेट तयार केले त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दिवसभरात दोन वेळा हे हेल्मेट सहा सहा मिनिटाच्या कालावधीसाठी परिधान केले तर त्याचा चांगला परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. आणि स्मरणशक्तीचे संवर्धन होते.
डिमेंशिया म्हणजेच विस्मरण या आजाराने त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी हे हेल्मेट वरदान ठरणार आहे ब्रिटनमध्ये दहा लाख पेक्षा जास्त लोकांना विस्मरणाच्या आजाराचा त्रास आहे जगातही अनेक ठिकाणी विस्मरणाचा आजार वाढत आहे.
हे हेल्मेट विकसित करणारे डॉक्टर गोगार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हे हेल्मेट डोक्यावर परिधान केल्यानंतर मेंदूपर्यंत इन्फ्रा रेड किरणे पोचतात मेंदूतील ज्या पेशी मृतप्राय झाल्या आहेत त्यांना परत जिवंत करण्याचे काम ही इन्फ्रारेड किरणे करू शकतात. त्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते आणि स्मरणशक्तीही विकसित होते.
या उपचार पद्धतीच्या आधारे नायट्रिक ऑक्साईडची पातळी वाढत असल्यामुळे रक्त अभिसरणाची प्रक्रियाही सुधारते आणि त्यामुळे मेंदूचे आरोग्यही चांगले राहते या हेल्मेट चा प्रयोग प्रथम १३ रुग्णांवर करण्यात आला होता त्या प्रयोगाचे निष्कर्ष समाधानकारक आल्याने त्याची घोषणा या विद्यापीठातर्फे करण्यात आली आहे.
डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

