Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Saqib Hussain Revealed : "माझ्याकडे १२ हजारांचे बूट घ्यायलाही पैसे नव्हते."; साकिब हुसेनसाठी 'हा' खेळाडू देवदूत बनून धावला, पाहा VIDEO

Saqib Hussain Revealed : "माझ्याकडे १२ हजारांचे बूट घ्यायलाही पैसे नव्हते."; साकिब हुसेनसाठी 'हा' खेळाडू देवदूत बनून धावला, पाहा VIDEO

प्रभात 2 weeks ago

Saqib Hussain revealed about his shoes : आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीत सनरायझर्स हैदराबादच्या एका युवा वेगवान गोलंदाजाने आपल्या धारदार गोलंदाजीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. हा खेळाडू म्हणजे बिहारचा साकिब हुसेन.

साकिबने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच ४ बळी घेत धमाका केला होता. इतकेच नव्हे तर, आयपीएल कारकिर्दीतील पहिल्या सलग १० सामन्यांत किमान एक तरी विकेट घेणारा तो इतिहासामधील एकमेव गोलंदाज ठरला आहे. या चालू हंगामात त्याने ११ सामन्यांत १५ विकेट्स घेत आपली छाप सोडली आहे. पण या यशामागे त्याचा अत्यंत भावुक आणि संघर्षाचा प्रवास दडला आहे.

इशान किशनने दिल्या ६ शूजच्या महागड्या जोड्या –

साकिबने क्रिकबझला दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की, भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज आणि बिहारचाच त्याचा सहकारी इशान किशनने त्याला ६ जोड्या महागडे क्रिकेट शूज घेऊन दिले आहेत. साकिब म्हणाला, “इशान भैय्याने मला ‘अ‍ॅडिडास अ‍ॅडिपॉवर’चे शूज मिळवून दिले. एक काळ असा होता की माझ्याकडे साधे शूज नव्हते. १२ ते १५ हजार रुपयांचे बूट खरेदी करण्याचा मी विचारही करू शकत नव्हतो. आज मी तेच शूज घालून आयपीएल खेळत आहे.” साकिबला हैदराबादने ३० लाख रुपयांच्या बेस प्राईजवर खरेदी केले होते. यापूर्वी तो २०२४ मध्ये विजेत्या केकेआर (KKR) संघाचा भाग होता, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

एकेकाळी आईने विकले होते स्वत:चे दागिने –

साकिबने आपल्या प्रवासाची आठवण सांगताना सांगितले की, त्याने टेनिस बॉल क्रिकेटपासून सुरुवात केली होती, जिथे त्याला एका मॅचचे अवघे ३०० रुपये मिळायचे. जर ५०० किलोमीटर लांब प्रवास केला, तर कुठे १०००-१२०० रुपये हाती यायचे. सर्वात हृदयस्पर्शी गोष्ट म्हणजे, जेव्हा साकिबला पहिल्यांदा महागड्या लेदर बॉल क्रिकेट शूजची गरज होती, तेव्हा त्याच्या आईने स्वतःच्या लग्नाचे दागिने विकून त्याला पैसे दिले होते, जेणेकरून साकिब आपले स्वप्न पूर्ण करू शकेल. आईच्या त्या त्यागाचे आणि इशान किशनच्या साथीचे फळ आज साकिबला मैदानावर मिळत आहे.

– RR vs SRH Eliminator : राजस्थान रॉयल्सची 'क्वालिफायर-२' मध्ये दिमाखात एन्ट्री! वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीने हैदराबादचं केलं पॅकअप

आयपीएलच्या १९व्या हंगामातील एलिमिनेटर सामना बुधवारी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात न्यू चंदीगड येथील मुल्लानपूर स्टेडियमवर खेळला गेला, ज्यात राजस्थान रॉयल्सने ४७ धावांनी विजय मिळवून क्वालिफायर २ मध्ये आपले स्थान निश्चित केले. या सामन्यात, नाणेफेक जिंकल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्यात राजस्थान रॉयल्सने २४३ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना, सनरायझर्स हैदराबादचा संघ १९६ धावांवर सर्वबाद झाला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat