Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सासूचा विनयभंग; जावयाला अटक

सासूचा विनयभंग; जावयाला अटक

प्रभात 6 years ago

पिंपरी - जुन्या भांडणाच्या कारणावरून जावयाने सासूला चपलेने मारहाण केली. तसेच तिचा विनयभंगही केला. ही घटना शनिवारी (दि. 19) दुपारी साडेचार वाजता पिंपळे गुरव येथे घडली.

पोलिसांनी आरोपी 37 वर्षीय जावयाला अटक केली आहे. याप्रकरणी त्याच्या सासूने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी आणि फिर्यादी महिला हे जावई आणि सासू आहेत. त्यांच्यात मागील काही दिवसांपासून भांडण सुरु होते. त्या भांडणाच्या कारणावरून जावयाने शनिवारी सासरवाडीत येऊन सासूला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यानंतर जावयाने सासूला चपलेने डोक्‍यावर आणि तोंडावर मारले. आरोपी जावयाने सासूला अश्‍लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat