Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Satara: चार हजार 43 विद्यार्थ्यांना 12 लाखांचे अनुदान, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत निधीस मान्यता

Satara: चार हजार 43 विद्यार्थ्यांना 12 लाखांचे अनुदान, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत निधीस मान्यता

प्रभात 3 months ago

Satara: सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत जिल्ह्यातील चार हजार 43 विद्यार्थ्यांना 12 लाख 12 हजार 900 रुपये अनुदान देण्यास जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीच्या सभापती सौ.

तेजस्विनी कदम यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली. यापूर्वी प्रतिविद्यार्थी 300 रुपये असलेले अनुदान 500 रुपये करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची सूचना सौ. कदम यांनी दिली.

या बैठकीस शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी उपस्थित होते. सध्या प्रतिविद्यार्थी 300 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येत आहे. वाढती महागाई व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेता हे अनुदान दरमहा किमान 500 रुपये करावे, यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची सूचना सौ. कदम यांनी नायकवडी यांना दिली.

त्यानंतर सौ. कदम यांच्या अध्यक्षतेखाली गटशिक्षणाधिकारी व समग्र शिक्षा अभियानातील अभियंत्यांची स्वतंत्र बैठक घेण्यात आली. स्मार्ट स्कूल अंतर्गत सुरू असलेली कामे निर्धारित मुदतीत व गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. सध्या व्हीपीडीएमार्फत मिळणारे अनुदान त्या दिनांकापासून एका वर्षात खर्च करणे बंधनकारक आहे. खर्च न झालेला निधी शासनाकडे परत जातो. त्यामुळे जिल्हा परिषदेकडील एकही रुपया शासनाकडे परत जाऊ नये, अशा सक्त सूचना सौ. कदम यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

भौतिक सुविधांचा अभाव असलेल्या शाळांची यादी तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. नवीन प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यानुसार कोणत्या अधिकार्‍यांनी प्रस्ताव सादर केले व कोणी प्रस्ताव दिलेले नाहीत, याचाही आढावा सौ. कदम यांनी घेतला. शाळांमधील स्वच्छतागृहांच्या स्थितीचा आढावा घेऊन, आवश्यक तेथे तातडीने कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat