Thursday, 14 Jan, 8.37 am प्रभात

महाराष्ट्र
सातारा जिल्ह्यात आणखी 67 नागरिक करोना संक्रमित

सातारा - जिल्ह्यात मंगळवारी (दि. 12) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार आणखी 67 नागरिक करोना संक्रमित आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी बुधवारी दिली. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी एकही करोनाबळी नसल्याने आणि रिकव्हरी रेट एक टक्‍क्‍याने वाढल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

सातारा तालुक्‍यामध्ये सातारा शहरात रविवार पेठ, गोडोली, सदरबझार प्रत्येकी एक, इतरत्र पाच, कोडोली, तामजाईनगर प्रत्येकी चार, शाहूपुरी, संभाजीनगर, भरतगाव, तोंडले, रामनगर प्रत्येकी एक, कराड तालुक्‍यात खराडे दोन, कराड, कोयना वसाहत, चरेगाव, हेळगाव प्रत्येकी एक, पाटण तालुक्‍यातील साळवे एक, फलटण तालुक्‍यात खुंटे चार, पवारवाडी तीन, कोळकी, फरांदवाडी प्रत्येकी दोन, फलटण, सांगवी, चौधरवाडी, खामगाव प्रत्येकी एक, खटाव तालुक्‍यात वडूज एक, माण तालुक्‍यात दहिवडी एक, कोरेगाव तालुक्‍यात रहिमतपूर, देऊर प्रत्येकी दोन, शिरंबे, खेड, नांदगिरी,

जळगाव प्रत्येकी एक, जावणी तालुक्‍यात पानस, मेढा प्रत्येकी एक, महाबळेश्वर तालुक्‍यात पाचगणी, तळदेव प्रत्येकी एक, वाई तालुक्‍यात सह्याद्रीनगर, जोशी विहीर प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्‍यात शिरवळ तीन, बकालवाडी एक, इतर एक, बाहेरील जिल्ह्यात सांगली एक, असे एकूण 67 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या 55 हजार 336 झाली असून उपचारार्थ रुग्णांची संख्या एक हजाराच्या आत आहे. करोनाबळींची संख्या 1803 वर स्थिर राहिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top