Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Satara: पेन्शनचे 50 हजार शिष्यवृत्तीसाठी देऊन वाढदिवस साजरा; राष्ट्रीय हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे यांची सामाजिक बांधिलकी

Satara: पेन्शनचे 50 हजार शिष्यवृत्तीसाठी देऊन वाढदिवस साजरा; राष्ट्रीय हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे यांची सामाजिक बांधिलकी

Satara: एक महिन्याची पन्नास हजार रुपये पेन्शन समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती म्हणून देऊन राष्ट्रीय हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे यांनी आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला.

त्यांच्या या स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रमाचे कौतुक होत आहे.

कासार समाज बांधवांची आर्थिक परिस्थिती पाहता समाजबांधव मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले असून पैशाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये अशी महेश यांचे वडील मधुकर कासार यांची इच्छा होती. वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी आपली एका महिन्याच्या पन्नास हजार रुपये पेन्शनमधून ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. परंतु त्यांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे. अशा कासार समाज्यातील कु. श्रेया प्रवीण दोडे, मु पो खामगाव जि. बुलढाणा, कु. साक्षी प्रशांत कोळपकर, नान्नज, ता. जामखेड जि. अहिल्यानगर, समर्थ वैभव डोळ, रा. म्हासुण, ता. खटाव, जि. सातारा, कु. संपदा संजय अक्कर, रा. शिक्रापूर, जि. पुणे, चैतन्य प्रदीप कासार, रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा या पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. या स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रमाचा आदर्श सगळयांनी घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat