Tuesday, 15 Oct, 10.54 am प्रभात

मुखपृष्ठ
सातारा शहराचा सर्वांगीण विकास हाच शिवेंद्रराजेंचा ध्यास

सौ. वेदांतिकाराजे; राजे कधीच जातपात मानत नाहीत

ते पाप पवार साहेबांनीच केलं
आपण ज्या साताऱ्यात राहतो त्या साताऱ्यात शिवछत्रपतींचा वारसा असलेले दोन्ही राजे कोणताही भेदभाव मानत नाहीत. साताऱ्यातील पाणी आणि रोजगार जर कोणी पळवले असतील तर ते फक्त पवार साहेबांनीच. 1988 ला मुख्यमंत्री असताना सातारा एमआयडीसीतील कारखाने बंद करून ते बारामतीला पळवण्याचे पाप पवार साहेबांनीच केलं, असा घणाघात नरेंद्र पाटील यांनी केला. आता दोन्ही राजेंना साथ देऊन साताऱ्याला गतवैभव मिळवून द्या, असे आवाहन पाटील यांनी भाषणात केले.

सातारा - सत्ता असेल तर मोठमोठ्या विकासकामांसाठी भरीव निधी मिळतो हे वास्तव आहे. विरोधात राहून हवी ती विकासकामे होणार नाहीत. म्हणूनच दोन्ही राजेंनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हद्दवाढ, कॉंक्रीट रस्ते हे प्रश्‍न मार्गी लागले असून शिवसृष्टी, एमआयडीसीमध्ये नवीन मेगा प्रोजेक्‍ट, मेडिकल कॉलेज अशी लोकहिताची विकासकामे मार्गी लावण्यासाठी दोन्ही राजें भाजपमध्ये गेले असून सातारा- जावली मतदारसंघाचा विकास हाच ध्यास ठेवून शिवेंद्रराजे कार्यरत आहेत.

दोन्ही राजें कधीच जातपात मानत नाहीत, भेदभाव करत नाहीत. विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता मतदारसंघाला रोल मॉडेल बनवण्यासाठी त्यांचे हात बळकट करा आणि दोन्ही राजेंना विजयी करा, असे आवाहन श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.

भारतीय जनता पार्टी, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे सातारा लोकसभा पोटनिवडणूकीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले आणि सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ रविवारी ढोर गल्ली येथे आयोजित भव्य कोपरा सभेत सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या.

यावेळी जेष्ठ नेते माजी नगराध्यक्ष अशोक तपासे, नरेंद्र पाटील, नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक अशोक मोने, स्मिता घोडके, दीपलक्ष्मी नाईक, बाळासाहेब खंदारे, शकील बागवान, धंनजय जांभळे, प्रकाश बडेकर, बाळासाहेब शिंदे, हेमांगी जोशी, राम हादगे, सुनील काळेकर, संगीत तपासे, भाऊ दळवी, हेमा तपासे, जुबेर कच्छी, सुरेश आंबवले, सतीश रावखंडे, अंकुश भिंगारदेवे, जालिंदर तपासे, कुमार तपासे, शुक्राचार्य भिसे यांच्यासह सर्व समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजिंक्‍यतारा कारखाना, सूत गिरणीच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला. चाळकेवाडी पठारावर 2800 मेगाव्याट वीज निर्मिती सुरु असून यातून विजेबरोबरच हजारो लोकांना रोजगाराची संधी मिळाली आहे. याशिवाय कास धरण उंची वाढ, कास पठार, ठोसेघर, वजराई धबधबा याच्या माध्यमातून पर्यटन वाढ, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, कण्हेर धरण, ठिकठिकाणी रस्त्यांचे जाळे, रिंग रोड, संपूर्ण मेढा भाग कोयना विभागाला जोडणारा कुसुंबी मार्गे रस्ता, महू हातेघर धरण, बोन्डारवाडी धरण तसेच सातारा शहराची हद्दवाढ, रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणासाठी 50 कोटी, अशी असंख्य कामे मार्गी लावून शिवेंद्रराजेंनी सातारा-जावलीचा कायापालट केला आहे. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता कमळालाच विजयी करा असे आवाहन श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.

यावेळी अशोक तपासे, सुनील काळेकर आदींनी मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब खंदारे यांनी दोन्ही राजेंना शहरात सर्वात जास्त मताधिक्‍य प्रभाग 7 आणि ढोर गल्लीतून मिळेल असा शब्द यावेळी दिला. जालिंदर तपासे यांनी आभार मानले. सभेस महायुतीतील सर्व पदाधिकारी, सर्व आजी माजी नगरसेवक यांच्यासह पेठेतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>