Thursday, 14 Jan, 8.21 am प्रभात

महाराष्ट्र
सातारा: युवकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

नागठाणे - कुटुंबातील महिलेस काही तरी बोलल्याच्या संशयावरून आसनगाव (ता. सातारा) येथील दीपक हणमंत पवार (वय 27) याला मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संपत अण्णा पवार, महेश संपत पवार व गणेश संपत पवार (रा. आसनगाव) यांच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 12) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. दीपक पवार याने गावातील आरसड नावाच्या शिवारात सोमवारी (दि. 11) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आसनगाव येथील महिलेस काही तरी बोलल्याच्या संशयावरून संपत पवार, महेश पवार व गणेश पवार यांनी दीपक पवार या युवकाला आधी गावात आणि त्यानंतर गावाबाहेर माळावर नेऊन लाकडी दांडक्‍याने मारहाण केली होती.

दीपकला सोडविण्यासाठी आलेला त्याचा छोटा भाऊ सोनू, चुलते शंकर साहेबराव पवार, सरपंच मनोज गायकवाड, रामचंद्र पवार यांनाही तिघांनी दमदाटी व मारहाण केली होती. उद्या तुला सगळ्या गावाच्या समोर मारतो, अशी धमकी देऊन तिघांनी दीपकला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद चुलते शंकर पवार यांनी मंगळवारी रात्री उशिरा दाखल केली. सपोनि डॉ. सागर वाघ तपास करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top