Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Shikrapur : नगर महामार्गावर बर्निंग कारचा थरार

Shikrapur : नगर महामार्गावर बर्निंग कारचा थरार

प्रभात 2 weeks ago

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) नजीक पुणे- नगर महामार्गावर कासारी फाटा येथे चालत्या कारने अचानक पेट घेऊन झालेल्या दुर्घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली. बर्निंग कारचा थरार पाहून काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनास्थळावरून आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूरनजीक नगर महामार्गावरुन संजय धुमाळ हे त्यांच्या कारमधून शिरुर बाजूने शिक्रापूरकडे येत होते. कासारी फाटा येथे कारच्या पुढच्या बाजूने धूर येत असल्याचे संजय यांना दिसून आल्याने त्यांनी तातडीने कार रस्त्याचे बाजूला घेतली. दरम्यान कारने काही क्षणात मोठा पेट घेतला. आगीने कारला मोठा वेढा घेतल्याने आगीने रौद्र रुप धारण केले.

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत संजय मुरलीधर धुमाळ (रा. शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात जळीत प्रकरणी नोंद केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गायकवाड हे करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat