Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Shikrapur News : कोरेगाव भीमा येथे दशक्रिया विधीच्या वेळी घरफोडी; शिक्रापूर पोलिसांकडून आरोपी जेरबंद

Shikrapur News : कोरेगाव भीमा येथे दशक्रिया विधीच्या वेळी घरफोडी; शिक्रापूर पोलिसांकडून आरोपी जेरबंद

प्रभात 2 weeks ago

Shikrapur News : कुटुंबीय आजोबांच्या दशक्रिया विधीसाठी बाहेर पडल्याची संधी साधून बंद घराचे कुलूप तोडणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना (Shikrapur News) मोठे यश आले आहे.

या कारवाईत पोलिसांनी मुख्य आरोपी धनंजय उर्फ धनाजी दत्तात्रय घोडके (रा. कात्रज, जि. पुणे) याला अटक करून त्याच्याकडून चोरी गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे, या घरफोडीचा मास्टरमाइंड पीडित कुटुंबाचा शेजारीच असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

नेमकी काय घडली घटना?

कोरेगाव भीमा (ता. शिरूर, जि. पुणे) येथील ढेरंगे वस्तीवर राहणारे किरण पंडित ढेरंगे (वय ३८) यांच्या आजोबांचे निधन झाले होते. १८ जुलै रोजी संपूर्ण कुटुंब घराला कुलूप लावून दशक्रिया विधीसाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून सर्वजण घरी परतले असता, त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले.

चोरट्याने कपाटातील सात तोळे वजनाचे (Shikrapur News) सोन्याचे दागिने आणि ५ हजार रुपयांची रोख रक्कम लांबवली होती. या प्रकरणी किरण ढेरंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून चोरटा निष्पन्न

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, महेश डोंगरे, जितेंद्र पानसरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लहानु बांगर, पोलीस हवालदार श्रावण गुपचे, नवनाथ नाईकडे, रोहिदास पारखे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, अमोल नलगे, नारायण वाळके, राम जाधव व मच्छिंद्र निचित यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून पाहणी केली.

सीसीटीव्ही विश्लेषणादरम्यान धनंजय उर्फ धनाजी घोडके याचा संशयास्पद वावर निदर्शनास आला. पोलिसांनी तातडीने शोध घेत कात्रज येथून धनंजय घोडके याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली.

चोरीचा कट उघड

अटक केलेल्या आरोपीची अधिक चौकशी केली असता या गुन्ह्यातील धक्कादायक माहिती समोर आली. किरण ढेरंगे यांच्या शेजारी राहणाऱ्या दीपक बाळासाहेब ढेरंगे यानेच या चोरीची संपूर्ण रूपरेषा आखली होती. पीडित कुटुंब (Shikrapur News) कधी बाहेर जाणार, घरात कोणती मौल्यवान वस्तू कुठे आहे, यावर दीपक बारीक लक्ष ठेवून होता. त्यानेच आरोपी धनंजय घोडके याला ही सर्व माहिती पुरवून घरफोडी घडवून आणली होती. शेजाऱ्याच्या या विश्वासघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणात पोलीस आता पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat