Friday, 06 Sep, 7.39 am प्रभात

मुखपृष्ठ
शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपतीकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली - शिक्षक दिनानिमित्त, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केले.

व्यक्तीच्या जडणघडणीचा मजबूत पाया, शालेय जीवनातच घातला जातो. विद्यार्थ्यांना उत्तम मानव म्हणून घडवणे हे शिक्षणाचे मुळ उद्दिष्ट आहे. यासाठी शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये सचोटी, शिस्त बाणवतात. आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम मनुष्य म्हणून त्याची जडणघडण करून राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत शिक्षक योगदान देतात असे राष्ट्रपती यावेळी म्हणाले.
माहितीच्या युगाकडून जग ज्ञानाच्या युगाकडे वाटचाल करत आहे.

आजच्या स्पर्धात्मक जगात आपल्याला कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मानवी करूणा यांच्यातला समतोल राखणे आवश्‍यक आहे. या तर्कसंगत ज्ञानाच्या आधारावरच हवामान बदल, प्रदूषण यासारख्या सध्याच्या आव्हानांना आपण देऊ शकतो. जल संवर्धनाचे महत्व विद्यार्थ्यांमध्ये रुजवून जलसंवर्धनाच्या राष्ट्रीय मोहिमेत शिक्षक योगदान देऊ शकतात असे राष्ट्रपती म्हणाले.

आपल्याकडे विपुल ज्ञान आहे आणि आपल्याकडे चांगली मूल्येही आहेत. परंतु जागतिकीकरण आणि स्पर्धेच्या युगात आपल्याकडे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी करुणा यांच्यात समन्वय असणे आवश्‍यक आहे, देश निर्मितीसाठी डिजिटल पातळी राखणे आणि चरित्र्य निर्माण करण्यामध्ये संतुलन असणे आवश्‍यक आहे. कारण ते केवळ ज्ञान असलेली व्यक्तीच बनवणार नाही, तर चांगले मानवही बनवेल, असे राष्ट्रपती म्हणाले.

तर्कसंगत ज्ञानाच्या जोरावर देशातील लोक हवामान बदल, प्रदूषण, वितळणारे हिमनग इत्यादी आव्हानांनाही तोंड देऊ शकतात. जलसंधारणाचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये जागवून शिक्षक जलसंधारणाच्या राष्ट्रीय अभियानात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात.

ज्ञान आणि शहाणपणाने परिपूर्ण अशी एक नवीन पिढी तयार करावी, जी सद्यस्थितीतील सर्व आव्हानांना यशस्वीरित्या सोडवू शकेल अशा शब्दांत राष्ट्रपतींनी शिक्षकांना आवाहन केले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशभरातून निवडलेल्या 46 शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top