Thursday, 10 Aug, 6.13 am प्रभात

मुख्य पान
शिक्षण महर्षी डॉ. बापुजी साळुंखे यांचे कार्य बहुमुल्य

लोणी काळभोर - शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे, शरिराला श्रमाकडे घेऊन जाणारे शिक्षण देता यावे, हे उद्दिष्ट मनाशी बाळगून ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार हे ध्येय मनाशी बाळगून बहुजन आणि अदिवासी समाजांतील मुलांसाठी महाराष्ट्रांतील 380 संस्कार केंद्रांतून शिक्षणप्रसाराचे बहुमुल्य कार्य केले, असे प्रतिपादन प्राध्यापक हेमंतकुमार डेंगळे यांनी केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित समाजभूषण गणपतराव काळभोर, लोणी काळभोर येथे संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या 30 व्या पुण्यस्मरणदिनी त्यांना अभिवादन करण्यात आले,यावेळी प्रा. डेंगळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनीलकुमार कुरणे होते. त्यांनी शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी अथक परिश्रमांतून शिक्षण संस्थेची स्थापना केली, त्यातून सुसंस्कारित विद्यार्थी घडावा हा त्यांचा उद्देश होता. समाज आणि राष्ट्र उभारणीसाठी विद्यार्थ्यांमधून माणूस घडवणे हे त्यांचे स्वप्न होते, असे मत व्यक्त केले.
यांप्रसंगी प्रज्वली शेलार आणि प्रणव शेलार या विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. एस. आर. निकम यांनी केले. प्रा. गायकवाड यांनी डॉ. बापूजींच्या कार्याचे वर्णन काव्यातून केले. मराठी विभागप्रमुख प्रा.बी. एस. जगताप यांनी बापूजींच्या विचारांची भित्तीपत्रीका तयार केली होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. एस. एस. गायकवाड यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. स्नेहा बुरगुल यांनी मानले.

Dailyhunt
Top