Tuesday, 11 Aug, 3.40 pm प्रभात

ताज्या बातम्या
शिरूर : ज्यादा वीजबिल आकारणी विरोधात मनसेचे खळखट्याक आंदोलन

शिरूर : कोरोना काळात मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना ज्यादा वीजबिल (अवाजवी वीजबिले) दिल्याच्या विरोधात आज शिरूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने शिरूर वीज वितरण कार्यालयातील उप कार्यकारीअभियंता हितेंद्र भिरुड यांचे केबिनची तोडफोड करून खळखट्याक आंदोलन करण्यात आले आहे.

अवाजवी वीज बिलाच्या विरोधात, शिरूर शहर मनसे व मनसे जनहित कक्ष यांनी वीजवितरण कंपनीची हंडी फोडली तीही मनसे स्टाईलने. या खळ खट्याकआंदोलनात मनसे शहर अध्यक्ष अविनाश घोगरे, मनसे जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष सुशांत कुटे, मनसे कामगार आघाडी तालुकाध्यक्ष रवींद्र गुळादे आदी नी वीज वितरण कंपनीचे कार्यालयात आंदोलन केले.

यावेळी शिरूर शहरासह नागरिकांना मार्च महिन्यापासून वाढीव बिले आली असून कोरोना काळात नागरिक अडचणी आले असताना जादा वीज बिल कमी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक वीज वितरण कार्यालयात चकरा मारत आहेत. परंतु अधिकारी जागेवर नाहीत. आधीच कोरोनामुळे नागरिक मेटाकुटीला आले असताना, वीज वितरण कंपनी वाढीव बिले देऊन नागरिकांना अडचणीत आणत असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला.

याबाबत शुक्रवारी 7 ऑगस्टला उपकार्यकारी अभियंता हितेंद्र भिरूड यांना भेटून याबाबत माहिती दिली परंतु त्यांनी उडवाउडवची उत्तरे दिली. आज वीज वितरण कंपनीचे कार्यालयाबाहेर अनेक नागरिक वीज बिले कमी करण्यासाठी आली होती परंतु, अधिकारी नसल्याने त्यांची हेळसांड होत आहे. यामुळे अधिकारी यांचे कार्यालय संतप्त मनसे सैनकांनी फोडून खळ खट्याक आंदोलन केले. येथील टेबल, खुर्ची, काच यावेळी या आंदोलनात नुकसान झाले आहे.

आधीच कोरोनानी सामान्यांचे प्रचंड हाल होत असताना,आधीच लोकांना खाण्याचे हाल झाली आहे त्यात या वाढीव विजबीलाने लोकांचे कंबरडे मोडले आहे. आज याच संदर्भात आम्ही विचारणा करण्यासाठी गेलो असता तिथे कुणीच नव्हते म्हणुन आम्ही आमच्या स्टाईल ने आंदोलन केले.

- सुशांत कुटे (जिल्हाध्यक्ष मनसे जनहित कक्ष)

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top