Friday, 18 Oct, 8.54 am प्रभात

मुखपृष्ठ
शिवतारेंवर राज्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवणार

युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची भेकराईनगर येथे ग्वाही

फुरसुंगी- विजय शिवतारे हे मंत्रिमंडळातील माझे आवडते मंत्री आहेत. पुढील पाच वर्षांत त्यांच्यावर राज्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. त्यांना उच्चांकी मतांनी निवडून देत माझ्यासोबत विधानसभेत पाठवा, असे आवाहन युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले.

पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ भेकराईनगर येथे आयोजित सभेत आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी माजी आमदार संभाजी कुंजीर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, शिवसेना हवेलीचे नेते शंकर हरपळे, तालुकाप्रमुख संदीप मोडक, उपतालुकाप्रमुख कैलास ढोरे, हवेली भाजपचे अध्यक्ष पंडितदादा मोडक, भाजप सरचिटणीस धनंजय कामठे, राहुल शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव सायकर, दशरथ काळभोर, महिला आघाडी संघटक सविता ढवळे, रुपाली भाडळे, पंचायत समिती सदस्य राजीव भाडळे, संतोष भाडळे, दादा कोंढरे, युवासेनेचे उपजिल्हाधिकारी शादाब मुलाणी, राजाभाऊ होले, शेतकरी मोर्चाचे केशव कामठे, चकित देशमुख, निर्मला मेमाणे, ज्ञानेश्‍वर कामठे, सारिका पवार, हनुमंत देशमुख यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेनेच्या वचननाम्यात दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यासाठी असतात. शिवतारे यांच्यावर दुष्काळी भागातील पोखरापूर येथील उपसा सिंचन योजनेची जबाबदारी मी सोपवली होती. 20 वर्षे ज्या लोकांना कॉंग्रेसला पाणी देता आले नव्हते त्यांना शिवतारे यांनी न्याय दिला. आदित्य ठाकरे म्हणाले की, पुरंदर, भोर आणि वेल्ह्यातील गुंजवणी धरण सुद्धा शिवतारे यांनी पूर्ण केले. मतदारसंघात विविध प्रकल्पांच्या माध्यमातून जवळपास 10 हजार कोटींचा निधी आणणारे शिवतारे बहुधा महाराष्ट्रातील एकमेव आमदार असावेत असेही ते म्हणाले.

  • ही शिवसेनेच्या हॅट्ट्रिकची सभा आहे. पुरंदर हवेलीची 10 वर्षांपूर्वीची अवस्था आणि आजची अवस्था यात प्रचंड फरक आहे. मतदारसंघ पूर्णपणे विकासकामांनी बदलून गेला आहे. फुरसुंगी, उरुळी देवाची ही 93 कोटींची पाणीयोजना हे माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठे काम मी मानतो. परिसरातील सर्व रस्ते कॉंक्रिट करण्यात आले आहेत. मंतरवाडीखडी मशीन चौक रस्त्याचेही काम जवळपास पूर्ण झाले आहे. विकासकामांच्या जोरावर पुन्हा एकदा पुरंदर-हवेलीत भगवाच फडकणार.
    -विजय शिवतारे, जलसंपदा राज्यमंत्री
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>