Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, 'धनुष्यबाण' कोणाला मिळणार?

Shivsena Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, 'धनुष्यबाण' कोणाला मिळणार?

Shivsena Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाबाबत आज बुधवारी (दि. 5) सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून कपिल सिब्बल हे अंतिम युक्तिवाद मांडतील. सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत या प्रकरणात अनेकदा सुनावणी घेतली आहे.

गेल्या ३ वर्षाहून अधिक काळ सुरू असलेले हे प्रकरण निकालाच्या टप्प्यात पोहचले आहे.

शिवसेना पक्षाची अधिकृत मान्यता, धनुष्यबाण चिन्हावरील दावा आणि शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित महत्त्वाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी काल मंगळवारी होऊ शकली नाही. वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी तयारीसाठी वेळ मागितल्याने न्यायालयाने ही सुनावणी आज दुपारी २ वाजता घेण्याचे निश्चित केले.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवणार की पुन्हा हे चिन्ह ठाकरेंना मिळणार याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. यामुळे आता आजच्या या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

ठाकरे यांच्याकडून सुप्रीम कोर्टात आव्हान

जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी बंड केले आणि त्यानंतर शिंदे यांच्याकडून पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावर दावा करण्यात आला. यावर उद्धव ठाकरे यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला होता. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि नाव हे एकनाथ शिंदेंना वापरण्याची परवानगी दिली. या निर्णयाविरोधात ठाकरे यांच्याकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. Shivsena Hearing

याचबरोबर शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांनीही स्वतंत्र याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्यास नकार दिलेल्या निर्णयाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून, या दोन्ही याचिका सुनावणीसाठी सूचीबद्ध आहेत.

आमदार म्हणजे पक्ष नव्हे असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात मांडला होता. सध्या या प्रकरणी अंतिम युक्तीवाद सुरू आहे. आमदारांच्या फुटीला मान्यता देत पक्षांतर बंदी कायद्यालाच हरताळ फासण्यात आला. निवडणूक आयोगाने विधिमंडळातलं बहुमत पाहिले परंतु पक्षीय बहुमताकडे दुर्लक्ष केले. विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांना अपात्र केले नाही. त्यामुळे आमदारांची फोडाफोडी ही घटनात्मक हाराकिरी असल्याचा आरोप सिब्बल यांनी कोर्टात केला होता. Shivsena Hearing

Pradeep Rawat : पहिल्या भेटीतच जडले प्रेम, नंतर घेतले सात फेरे; अशी होती प्रदीप रावत यांची लव्हस्टोरी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat