Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरच्या 'नागिन' चित्रपटाची अपडेट समोर

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरच्या 'नागिन' चित्रपटाची अपडेट समोर

Shraddha Kapoor : अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या 'नागिन' या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली आहे. ६ वर्षांपूर्वी श्रद्धा कपूरच्या 'नागिन' चित्रपटाची घोषणा झाली होती.

पण नंतर हा चित्रपट बंद करण्यात आल्याची चर्चा सुरु झाली. परंतु आता या चित्रपटाचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. (Shraddha Kapoor)

श्रद्धा कपूरच्या या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे की, हा चित्रपट बंद झालेला नाही आणि त्यावर अजूनही काम सुरू आहे. चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी श्रद्धा कपूरचे नाव निश्चित असून ती यामध्ये ‘इच्छाधारी नागिन’ची भूमिका साकारणार आहे. (Shraddha Kapoor)

चित्रपट निर्माते निखिल द्विवेदी यांनी सांगितले की, “मला माहीत आहे की मी अनेकदा या चित्रपटाबाबत विधान केले आहे, पण आता आम्ही हा चित्रपट लवकरच सुरु करणार आहोत.” (Shraddha Kapoor)

चित्रपटाचे शूटिंग अजून सुरू झालेले नाही, पण लवकरच सर्व गोष्टी पूर्वपदावर येतील. चित्रपटाबाबत कोणतीही नवीन माहिती न आल्याने चित्रपट रद्द झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, निर्मात्यांच्या स्पष्टीकरणामुळे पुन्हा आशेचा किरण दिसला आहे. (Shraddha Kapoor)

'नागिन' (Nagin )या चित्रपटासाठी अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचे नाव आधीच निश्चित झाले असून, ती यात इच्छाधारी नागिणीची भूमिका साकारणार आहे. श्रद्धा कपूरने २०२० मध्ये एका ट्विटद्वारे ती मोठ्या पडद्यावर ‘नागिन’ बनणार असल्याची माहिती शेअर केली होती. दुसरीकडे, अभिनेता कार्तिक आर्यन देखील ‘नागजिला’ या चित्रपटातून सापांची वेगळीच दुनिया दाखवणार आहे. (Shraddha Kapoor)

दरम्यान, ‘नागिन’पूर्वी श्रद्धाचा बहुचर्चित ‘ईठा’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चाहते देखील आतुरतेने वाट पाहत आहे. Shraddha Kapoor

Urfi Javed video : '1 लाख रुपये? आधी जाऊन बघा, मी एका इन्स्टाग्राम रीलसाठी किती मानधन घेते'; उर्फी जावेद प्रचंड चिडली

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat