Sunday, 20 Sep, 6.32 am प्रभात

ताज्या बातम्या
श्रमिक एक्‍सप्रेसमध्ये 97 स्थलांतरीतांचा मृत्यू

नवी दिल्ली - लॉकडाऊनच्या काळात देशभरात श्रमिक एक्‍सप्रेसमध्ये 97 स्थलांतरीतांचा मृत्यू झाला असल्याची कबूली सरकारने आज प्रथमच राज्यसभेत दिली. स्थलांतरीतांच्या मृत्यूचा आकडा आपल्याला माहित नसल्याचे सांगितल्याने सरकारवर गेले काही दिवस टिकेची झोड उठत होती. त्यामुळे सरकारने आज दिलेल्या कबुलीला महत्व प्राप्त झाले आहे.

विविध राज्यांच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 सप्टेंबरपर्यंत श्रमिक रेल्वेत 97 जण मरण पावले, असे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. याबाबत तृणमूल कॉंग्रेसचे नेते डेरेक अब्रियन यांनी शुक्रवारी प्रश्‍न उपस्थित केला होता.

श्रमिक एक्‍सप्रेस एक मेपासून सुरू करण्यात आली. एकूण चार हजार 621 श्रमिक एक्‍सप्रेस धावल्या. त्यातून 63 लाख 19 हजार स्थलांतरीतांना नेण्यात आले, असे मंत्र्यांनी सांगितले.

मृत्यू जुन्या विकारांनी
गोयल म्हणाले, या 97 घटनांमध्ये 87 जणांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यापैकी 51 अहवाल अद्याप प्राप्त झाले असून त्यात मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका, हृदयविकार, मेंदुतील रक्तस्राव, पुर्वीचे जुने आजार, फुफ्फुसांचे विकार, यकृताचे विकार असल्याचे आढळून आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top