Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Shweta Tiwari : 4 अफेअर्स, दोनदा लग्न; श्वेता तिवारीच्या खाजगी आयुष्यात बरंच काही घडलं, वाचूल बसेल धक्का!

Shweta Tiwari : 4 अफेअर्स, दोनदा लग्न; श्वेता तिवारीच्या खाजगी आयुष्यात बरंच काही घडलं, वाचूल बसेल धक्का!

प्रभात 2 weeks ago

Shweta Tiwari : 'कसौटी जिंदगी की' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता तिवारी ही तिच्या अभिनयासोबतच खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिली आहे. आता ती पुन्हा एकदा तिचे वैवाहिक आयुष्य, घटस्फोट आणि कथित रिलेशनशिप्समुळे चर्चेत आली आहे.

यांचं कारण म्हणजे तिचा पहिला पती राजा चौधरी यांनी केलेला आरोप.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजा चौधरी यांनी श्वेताचे अनेक पुरुषांसोबत अफेअर असल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांमुळे मनोरंजनविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. या आरोपांवर श्वेताने सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. पण तिचे नाव कोणाकोणासोबत जोडले गेले होते, याची चर्चा होत असून याविषयी जाणून घेऊयात…

सीझेन खान

'कसौटी जिंदगी की' मालिकेदरम्यान श्वेता तिवारी आणि अभिनेता सीझेन खान यांच्या जवळीकीच्या चर्चा रंगल्या होत्या. श्वेताने या चर्चा अफवा असल्याचे सांगून फेटाळल्या होत्या. मात्र, सीझेन खानने एका मुलाखतीत श्वेतासोबतच्या नात्याबाबत भाष्य केले होते, ज्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आले होते.

विशाल आदित्य सिंह

अभिनेता विशाल आदित्य सिंह याच्यासोबतही श्वेताचे नाव जोडले गेले होते. दोघांनी 'बेगुसराय' मालिकेत एकत्र काम केले होते. त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, विशालने या सर्व चर्चांना केवळ अफवा असल्याचे म्हटले होते.

मनोज तिवारी

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि भाजप खासदार मनोज तिवारी यांच्यासोबतही श्वेता तिवारीचे नाव चर्चेत आले होते. दोघांनी अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यावेळी त्यांच्या नात्याबाबत विविध चर्चा रंगल्या होत्या. तथापि, या चर्चांबाबत दोघांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आली नव्हती. आजही दोघांमध्ये चांगली मैत्री असल्याचे म्हटले जाते.

फहमान खान

अभिनेता फहमान खान याच्यासोबतही श्वेताचे नाव जोडले गेले होते. 'मेरे डॅड की दुल्हन' या मालिकेत दोघांनी एकत्र काम केले होते. लॉकडाऊन काळात फहमान श्वेताच्या घरी गेल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याबाबत चर्चांना सुरुवात झाली. मात्र, या दोघांनीही अशा चर्चांना फारसे महत्त्व दिले नाही.

दोन विवाह, दोन घटस्फोट

श्वेता तिवारीचे पहिले लग्न अभिनेता राजा चौधरी यांच्यासोबत झाले होते. या दाम्पत्याला पलक तिवारी ही मुलगी आहे. मात्र, काही वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. यानंतर श्वेताने अभिनेता अभिनव कोहली याच्यासोबत दुसरे लग्न केले. या विवाहातून तिला एक मुलगा झाला. मात्र, हे नातेही फार काळ टिकले नाही. श्वेताने अभिनव कोहली यांच्यावर गंभीर आरोप करत वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे श्वेताच्या खाजगी आयुष्यात मोठी उलाथापालथ घडल्याचे यावरुन लक्षात येते.

द ट्रेटर्स 2 मधून येणार भेटीला

राजा चौधरी आणि श्वेता तिवारी यांच्यातील नातं संपून आता अनेक वर्षांच्या काळ लोटला आहे. आता पुन्हा एकदा या नात्याला घेऊन विविध चर्चांना उधाण आलं आहे. अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्याचा प्रयत्न ती करत असते. सध्या द ट्रेटर्स 2 या नव्या वेबसिरीजमधून श्वेता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिरीजचं लक्षवेधक पोस्टर अभिनेत्रीने तिच्या इंन्स्टाग्रामवरुन शेअर केलं आहे.

West Bengal STF: CJP आंदोलनाच्या आडून दिल्लीत दहशतीचा कट? ; जैश दहशतवाद्याच्या मैत्रिणीलाही अटक

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat