Shwetank Tambe passed away : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे वांद्रे पूर्व विधानसभा समन्वयक श्वेतांक तांबे यांच्या अकस्मात निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
अवघ्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपला 30वा वाढदिवस साजरा केला होता. मात्र एका अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हसतमुख स्वभाव आणि सर्वांशी आपुलकीने वागण्याच्या गुणामुळे श्वेतांक यांनी अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने एक तरुण, तडफदार आणि निष्ठावंत शिवसैनिक गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या जाण्याने मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर श्वेतांक यांच्या आठवणी जागवत दु:ख व्यक्त केले आहे.
विशेष म्हणजे विविध राजकीय पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांनीही श्वेतांक यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर (Shwetank Tambe passed away)
श्वेतांक यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आईसोबतचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, जो आता अनेकांना भावुक करत आहे.
आदित्य ठाकरेंकडून संवेदना व्यक्त
श्वेतांक तांबे यांच्या अपघाती निधनानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी संवदेना व्यक्त केल्या आहेत. युवासेना वांद्रे (पूर्व) विधानसभा समन्वयक, निष्ठावंत शिवसैनिक श्वेतांक तांबे ह्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि तांबे कुटुंबियांना ह्या दुःखातून सावरण्याचे बळ देवो. भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शांती. अशा शब्दांत त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे श्वेतांक यांना श्रद्धांजली वाहिली. (Shwetank Tambe passed away)
Tamil Nadu: तामिळनायडूत टीव्हीके १० जागापासून दूर; सत्तेचे समीकरण कसं जुळणार?

