Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Siddaramaiah : सिद्धरामय्या यांना अभय की बदल? कर्नाटकविषयीचा संभ्रम कायम

Siddaramaiah : सिद्धरामय्या यांना अभय की बदल? कर्नाटकविषयीचा संभ्रम कायम

प्रभात 1 month ago

Siddaramaiah : कर्नाटकसंदर्भात मंगळवारी दिल्लीत कॉंग्रेसची महत्वपूर्ण बैठक झाली. त्यामध्ये नेतृत्वबदलावर (Siddaramaiah) कुठलीही चर्चा झाली नसल्याची माहिती पक्षाच्या गोटातून देण्यात आली.

मात्र, कॉंग्रेसशासित कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदल निश्‍चित असल्याचे संकेत देणारे वृत्त काही वाहिन्यांनी प्रसिद्ध केले. त्यामुळे कॉंग्रेस श्रेष्ठींनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांना अभय दिले की बदल होणार याविषयीचा संभ्रम कायम राहिला.

कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदल करायचा की नाही याविषयीचा ठोस निर्णय कॉंग्रेस श्रेष्ठी इतर राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकानंतर घेतील, असा अंदाज वर्तवला जात होता.

त्याविषयी चर्चा रंगलेल्या असतानाच कॉंग्रेस श्रेष्ठींनी सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांना दिल्लीला पाचारण केले. त्यांच्या समवेत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, पक्षाचे कर्नाटक प्रभारी रणदीप सुरजेवाला यांची मॅरेथॉन बैठक झाली.

अनेक तास चाललेल्या बैठकीनंतर पक्षाचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल पत्रकारांना सामोरे गेले. कर्नाटक विधान परिषद आणि त्या राज्यातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या जागांसाठी लवकरच निवडणुका होणार आहेत. केवळ त्या निवडणुकांवरच चर्चा झाली. नेतृत्वबदलाविषयी सुरू असलेल्या चर्चा फक्त अंदाज आहेत. त्यामध्ये कुठले वास्तव नाही, असे भाष्य त्यांनी केले.

त्यावेळी त्यांच्या बाजूला सिद्धरामय्या आणि शिवकुमारही होते. पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना सिद्धरामय्या यांनीही नेतृत्वबदलावर कुठली चर्चा झाली नसल्याचे ठामपणे म्हटले. त्यामुळे सिद्धरामय्या यांची खुर्ची कायम राहणार असल्याचे चित्र समोर आले. मात्र, काही वाहिन्यांनी दिलेल्या बातम्यांमुळे पुन्हा भुवया उंचावल्या गेल्या.

येत्या काही दिवसांत सिद्धरामय्या (Siddaramaiah) राजीनामा देतील. त्यांच्या जागी शिवकुमार यांच्याकडे सुत्रे सोपवली जातील, असा दावा त्या बातम्यांमधून कॉंग्रेस सुत्रांच्या हवाल्याने करण्यात आला. त्यामुळे पुढील काही दिवस तरी नेतृत्वाबदलाविषयीच्या चर्चांना खतपाणी मिळाले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat