Monday, 22 Jul, 7.14 am प्रभात

महाराष्ट्र
सिना कोळेगाव प्रकल्प; शेतकऱ्याकडून लाच घेणारा अनुरेखक गजाआड

उस्मानाबाद - जमिन भुसंपादनामध्ये येत नसल्याचा दाखला देण्यासाठी शेतकऱ्याकडून 1 हजार 200 रुपयांची लाच घेणे सिना-कोळेगाव प्रकल्पाच्या अनुरेखकाला चांगलेच महागात पडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्याच्यावर कारवाई करीत त्याला रंगेहाथ पकडले.

परंडा तालुक्‍यात असलेल्या सिना-कोळेगाव प्रकल्पामध्ये तक्रारदार शेतकऱ्याची जमिन भुसंदानामध्ये येत नसल्याचा दाखला शेतकऱ्याला हवा होता. मात्र, सिना-कोळेगाव प्रकल्प उपविभाग 3 चे अनुरेखक भारत दगडु माळी (वय-57) यांनी हा दाखला देण्यासाठी शेतकऱ्याकडे 1 हजार 200 रुपयाच्या लाचेची मागणी केली. लाच मागितल्यानंतर तक्रार दाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.

लाचलुचतप प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची शहानिशा करुन आज (सोमवार दि. 22) परंडा येथील सिना-कोळेगाव प्रकल्प, उपविभाग 3 कार्यालयात सापळा रचला. व आरेखक भारत माळी याला 1 हजार 200 रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले. माळी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात येत असून अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक बहीर हे करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top