Sunday, 25 Aug, 8.15 pm प्रभात

राष्ट्रीय
सिंधूचे यश खेळाडूंना प्रेरणा देणारे- पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली - भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आज (दि. 25) इतिहास रचला. सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम लढतीत सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला 21-7, 21-7 असे पराभूत केले. सिंधूने हा सामना जिंकून सुवर्णपदक पटकावलं आहे.

दरम्यान, पी. व्ही. सिंधूच्या या ऐतिहासिक कामगिरी बद्दल देशाचे पंतप्रधान 'नरेंद्र मोदी' यांनी ट्विटरच्या माध्यमातून तिचे अभिनंदन केले आहे. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top