Sunday, 25 Aug, 8.50 pm प्रभात

मुख्य पान
सिंधूच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन!

मुंबई- भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने अखेरीस अंतिम फेरीतील अपयश मागे सोडून जेतेपदाला गवसणी घातली. अंतिम लढतीत सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला 21-7, 21-7 असे पराभूत केले असून, सिंधूने हा सामना जिंकून सुवर्णपदक पटकावलं आहे. त्यामुळे जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्मपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

दरम्यान, पी. व्ही. सिंधूच्या या ऐतिहासिक कामगिरी बद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून सिंधूचे अभिनंदन केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top