Wednesday, 21 Apr, 1.45 pm प्रभात

मुखपृष्ठ
सीरमकडून कोविशिल्ड लसीचे दर निश्चित; 'ही' असणार राज्य सरकार, खासगी रुग्णालयांसाठी किंमत

नवी दिल्ली : देशात रोज कोरोनाबाधितांचा आकडा विक्रम प्रस्थापित करत आहे. गेल्या काही दिवसांत देशात अडीच लाखांच्या वर रुग्णांची नोंद झाल्याचे समोर आहे. तर दुसरीकडे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारांनीही कठोर निर्बंध लावण्यास सुरूवात केली आहे. तसेच संपूर्ण देशभरात लसीकरणाची मोहीम देखील हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, आता कोरोना प्रतिबंधात्मक लस तयार करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या लसींच्या किंमती निश्चित केल्या आहेत. त्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचाही क्रमांक लागतो. कंपनीने आपल्या लसीचे दार निश्चित केले आहेत.


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आता कोरोना प्रतिबंधात्मक लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनाही उत्पादनाच्या ५० टक्के लसींची विक्री खुल्या बाजारात करता येणार आहे. या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं आपल्या कोविशिल्ड या लसीचे दर निश्चित केले आहेत.

भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं आपल्या कोविशिल्ड लसीचे दर निश्चित केले आहेत. राज्य सरकारांना सीरम ही लस ४०० रूपये प्रति डोसच्या हिशोबानं तर खासगी रुग्णालयांना सीरम ही लस ६०० रूपये प्रति डोसच्या हिशोबानं देणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top