Tuesday, 01 Mar, 7.06 am प्रभात

अॅप कॅर्नर
स्टिकर बोले, चॅट चाले।

- अनुजा मुळे

हाईक स्टिकर्सद्वारे करा मनातील भावना व्यक्त

हाईकच्या युझर्सची संख्या नुकतीच 100 मिलियन वर पोहोचली. खरतर यात आश्‍चर्य करण्यासारखे काही नाही. हाईकने आपल्या वापरकर्त्यांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तरूणाईमध्ये तर हाईकबद्दल विशेष लोकप्रियता आढळते. हाईकची सर्वात लोकप्रिय दोन फीचर्स म्हणजे हाईकची टाईमलाईन आणि दुसरे म्हणजे हाईकचे स्टिकर्स. हे स्टिकर्स तरूणांना इतके का आवडतात या प्रश्‍नाचे उत्तर आता सापडले आहे. देशातील 8 वेगवेगळ्या भाषांत हे स्टिकर्स वापरायला मिळतात. रोजच्या चर्चेतील जवळपास सर्वच विषयांचे स्टिकर्स हाईक वर डाऊनलोड करता येतात.
जोडप्यांचे तर हाईक विशेष लाडके आहे. हाईक वरचे स्टिकर्स वापरून अगदी प्रेमाची विचारणाही करता येते. तसेच काही वेळा ज्या गोष्टी स्पष्टपणे बोलून व्यक्त करता येत नाहीत, त्या या स्टिकर्सद्वारे बोलता येतात. या स्टिकर्समुळे तर जोडप्यांना प्रेमाच्या आणाभाका देखील घेता येतात. तसेच हॉस्टेल मधील मजा-मस्ती, बॉलीवूडचा तडका, मराठी चित्रपटातील खास आठवणीतील डायलॉग्सचे देखील स्टिकर्स आपल्याला मिळू शकतात. तरूणाईच्या रोजच्या वापरातील "हवा', "तुच भावा' सारखे शब्द स्टिकर्सद्वारे आपण बोलू शकतो. मुलीमुलींच्या गप्पा, मुलांमधले नेहमी वापरले जाणारे शब्द, आई-बाबांची रोजची भाषणबाजी, परीक्षेचा फीव्हर, त्या त्या शहरांच्या विशेष जागा, मराठी सीरीयल्स मधील फेमस डायलॉग्स अशा अनेक गोष्टींचे स्टिकर्स हाईक वर उपलब्धा आहेत. त्याचबरोबर तरूणींना क्‍यूट वाटतील असे काही कार्टून्स देखील या स्टिकर्स मध्ये बघायला मिळतात. हनी सिंगची फेमस गाणी, क्रिकेट, मुंबई दर्शन यांसारखे स्टिकर्स देखील हाईक वर आपण इतरांना पाठवू शकतो.
या हाईक स्टिकर्स द्वारे आपण जवळपास सर्वच गोष्टी व्यक्त करू शकतो. प्रत्येकवेळी बोलायची गरज आपल्याला पडत नाही. तसेच जर आपल्याल टाईपिंगचा कंटाळा आला असेल, तर हाईक हा बेस्ट ऑप्शन आहे. यामुळे चॅटींग ही एक मजा बनून जाते. वेळ घालवण्यासाठी हाईकचा वापर आपण करू शकतो. काही ग्रुप्स मध्ये तर असे हाईकबहाद्दर असतात. सतत हाईक वर स्टिकर्स पाठवून इतरांना भंडावून सोडण्यासाठी ते प्रसिद्ध असतात. सणावारांना तर हाईक स्टिकर्सचा विशेष पॅक डाऊनलोड करता येतो. मग सणाच्या शुभेच्छा देखील हाईक स्टिकर्सद्वारे दिल्या जातात. तर मग तुम्हीही घ्या फोन हातात आणि करा हाईक डाऊनलोड.
Dailyhunt
Top