Dailyhunt
Sunetra Pawar : बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या.! सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन

Sunetra Pawar : बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या.! सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन

प्रभात 2 weeks ago

Sunetra Pawar - उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीसाठी ठाकरेसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठिंब्याची मागणी केली आहे.

या विषयावर चर्चा करण्यासाठी पवार यांनी शुक्रवारी ठाकरे यांना फोन केला होता. या घडामोडीला ठाकरेसेना सचिव आणि विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर, तसेच पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. यावेळी बारामती पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाली. ठाकरे लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील आपला निर्णय जाहीर करतील, असे राऊत यांनी सांगितले.

दिवंगत अजित पवार आणि पवार कुटुंबाशी असलेले आपले जवळचे संबंध लक्षात घेता, सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्यास ठाकरे यांची कोणतीही हरकत नसल्याचे सांगण्यात येत आहे. २३ एप्रिल रोजी बारामती पोटनिवडणूक होणर आहे. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आपला कोणताही उमेदवार उभा करणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) यापूर्वीच जाहीर केले आहे.

तथापि, कॉंग्रेस पक्ष बारामती पोटनिवडणूक लढवणार असल्याचे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने यासाठी हिरवा कंदील दाखवला असून, काही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या आहेत, असे काँग्रेसच्या प्रदेश शाखेने दावा केला आहे.

पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन :

बारामती विधानसभा मतदारसंघात होणारी पोटनिवडणूक बिनविरोध पार पाडावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले आहे. तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक घेणे आवश्यक झाले आहे.

या निवडणुकीद्वारे त्यांच्या पत्नी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवडून द्यावे. महाराष्ट्राच्या राजकीय परंपरांचा आदर करण्यासाठी सुनैत्रा पवार यांना पाठिंबा देण्याबाबत सर्वसंमती साधावी, असे त्यांनी आग्रहाने सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat