Dailyhunt
Supriya Sule: "काँग्रेस पक्षाचे योगदान फार मोठे, ते नाकारुन चालणार नाही," पार्थ पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Supriya Sule: "काँग्रेस पक्षाचे योगदान फार मोठे, ते नाकारुन चालणार नाही," पार्थ पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Supriya Sule: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी महायुतीकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्याने याप्रकरणी विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

अलीकडेच राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी थेट काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु झाल्याचे म्हंटले. यानंतर काँग्रेसकडूनही ट्वीटद्वारे पार्थ पवार यांना प्रत्युत्तर देण्यात आले. यावर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यामांसोबत संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आपण लोकशाहीवर विश्वास ठेवणारी लोकं आहोत. काँग्रेस संविधानाच्या चौकटीत काम करत आहे. आम्ही काँग्रेस पक्ष अतिशय जवळून पाहिला आहे. मी काँग्रेसच्या मतांवरही निवडून आले आहे. आज आपण जो मोकळा श्वास घेतोय ही काँग्रेस पक्षाची देन आहे हे कोणीच नाकारु शकत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे योगदान फार मोठे आहे ते नाकारुन चालणार नाही.

या देशाचे पंतप्रधान ते सरपंच, महिला आरक्षण, नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी आणलेले आर्थिक धोरण, या सगळ्याबाबात काँग्रेसचे योगदान नाकारुन चालणार नाही. मात्र, लोकशाहीत सगळ्यांना बोलण्याचा अधिकार असतो. त्यामुळे ते (पार्थ पवार) बोलत असतील,” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

तसेच “हा प्रश्न मला विचारण्याच्या ऐवजी अजित पवार गटाच्या नेत्यांना विचारला पाहिजे कारण त्यांच्या एका खासदाराचे ते मत आहे. याचा अर्थ त्यांच्या पक्षाचे ते मत असेल. त्यांचे काय मत आहे यावर मी बोलण्यापेक्षा त्यांच्या गटाला विचारायला हवं,” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.

महत्त्वाच्या निर्णयांवर स्टेटमेंट करताना परिपक्वता लागते – शरद पवार

दरम्यान, पार्थ पवार यांनी काँग्रेस पक्षाबाबत केलेल्या वक्तव्यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांचे कान टोचले होते. ‘मला असं वाटतं की राजकारणामध्ये काही महत्त्वाच्या निर्णयांवर स्टेटमेंट करायला एकप्रकारची परिपक्वता लागते. ती कितपत आहे, हे आज मी सांगू शकत नाही’, असे शरद पवार यांनी म्हटले होते.

‘कौटुंबिक सल्ला चॅनेलवर नव्हे तर घरात दिला जातो’

याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आले असता त्यांनी म्हटले की, “आदरणीय पवार साहेब कर्तृत्व, वयाने आणि नात्याने सर्वच बाबतीत माझ्यापेक्षा मोठे आहेत. आपल्यापेक्षा मोठ्या लोकांनी बोलल्यावर आपण काहीच बोलायचं नसतं हे माझे संस्कार आहेत. त्यामुळे मी यावर बोलणार नाही. पार्थला सल्ला देण्याचा प्रश्न असेल तर कौटुंबिक सल्ला चॅनेलवर नव्हे तर घरात दिला जातो,” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

Chetak Screen Awards 2026 : धर्मेंद्र यांचा लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार स्वीकारताना बॉबी देओलला अश्रु अनावर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat