Monday, 22 May, 5.45 am

मुख्य पान
'स्वरधुंद चांदण्याचे' मैफिलीत रसिस मंत्रमुग्ध

पुणे (प्रतिनिधी) - मराठी गजल क्षेत्रात आपल्या गजलेचा ठसा मराठी मनावर उमटविणारा गजलकार रमण रणदिवे यांचा "स्वरधुंद चांदण्याचे' गीत व गजलची मैफिल नुकतीच पार पडली. या अनोख्या मौफिलीला प्रसिद्ध गायक राजेश दातार, अनुराधा कुबेर व अभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्या विशेष उपस्थितीत व सादरीकरणाने पुणेकर मंत्रमुग्ध झाले.
मराठीत गाजलेले गीत "जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे. जगणाऱ्याने जगता जगता मजेत गावे गाणे'. या गीताने सुपरिचित असलेले गजलकार रणदिवे यांनी रसिकांना त्यांच्या गजल, कविता व किस्से ऐकीवले. यावेळी कवी विवेक घोडमारे यांच्या "आभाळ तोलताना' या काव्यसंग्रहांचे प्रकाशन करण्यात आले. राजेश दातार यांनी या मैफिलीत जमेल तेव्हा जमेल त्याने, केला सुरू फुलांनी, मनासारखे काही अशी एकाहून एक बहारदार गीते सादर केली या गीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली. त्याच बरोबर अनुराधा कुबेर यांनी रे सावल्या घना, भरलेत्या अशी गीते त्यांनी सादर केली. अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी कवी रमण रणदिवे यांच्या काही कवितांचे खुमसदारपणे वाचन केले. यावेळी निलेश रणदिवे, निखिल रणदिवे, नितीन जाधव, प्रमोद जांभेकर आणि निनाद सोलापूरकर यांनी या मैफिलीला समर्पक साथ दिली, या मैफिलीचे निवेदन वीणा गोखले यांनी केले.

Dailyhunt
Top