Friday, 30 Jul, 10.40 am प्रभात

मुख्य बातम्या
स्वारगेट परिसरात वाहतूक मार्गात बदल, 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर

पुणे - स्वारगेट येथे सुरू असणाऱ्या मेट्रोच्या कामासाठी टिळक रस्त्यावरून सारसबागेकडे जाणारा ए. आर. भट्ट मार्ग पूर्वेकडील गेटपासूनचा रस्ता पुढील आदेशापर्यंत बंद केला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

स्वारगेट विभागात मेट्रोतर्फे देशभक्‍त केशवराव जेधे चौक ते सारसबाग रोडदरम्यान वेस्ट सबवेचे काम करण्यासाठी 29 जुलैपासून पुढील आदेशापर्यंत प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. यात टिळक रस्त्यावरून सारसबागेकडे जाणारा ए. आर. भट्ट मार्ग (गणेश कला क्रीडा रंगमंच) पूर्वेकडील गेटपासून पुढे बंद करण्यात येत आहे.

त्याऐवजी टिळक रस्त्याकडून सारसबागेकडे जाणारी वाहने ए. आर. भट्टमार्गे गणेश कला क्रीडा रंगमंच ईस्ट गेटपासून पेशवे मार्ग, नटराज हॉटेलकडून इच्छित स्थळी जाणाऱ्या मार्गाचा नागरिकांनी वापर करावा. याबाबत नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top