Dailyhunt
Tamil Nadu news: देशात पहिल्यांदाच 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा ; पोलिस कोठडीत बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय

Tamil Nadu news: देशात पहिल्यांदाच 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा ; पोलिस कोठडीत बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय

Tamil Nadu news: पोलिस कोठडीत झालेल्या बेदम मारहाणीमुळे बाप-लेकाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात मदुराई जिल्हा न्यायालयाने मोठा निर्णय देत 9 पोलिस कर्मचाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणात निरीक्षक श्रीधर यांच्यावर 15 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

या प्रकरणातील दोषींमध्ये निरीक्षक श्रीधर, उपनिरीक्षक बालाकृष्णन व रघु गणेश तसेच पोलिस कर्मचारी मुरुगन, समदुरई, मुथुराजा, चेल्लादुरई, थॉमस फ्रान्सिस आणि वेइलुमुथु यांचा समावेश आहे.

न्यायालयाने निरीक्षणात म्हटले की, "बाप-लेकाला सूडबुद्धीने निर्वस्त्र करून अमानुष मारहाण करण्यात आली. हा प्रकार वाचूनही अंगावर शहारे येतात. न्यायालयाच्या देखरेखीअभावी हे सत्य दडपले गेले असते." या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज सादर करण्यात आले, जे अशा प्रकरणांमध्ये क्वचितच घडते, असेही न्यायालयाने नमूद केले. Tamil Nadu news

– ममता बॅनर्जी की भाजप, पश्चिम बंगालमध्ये यावेळी कोण स्थापन करणार सरकार?

तसेच, तमिळनाडूमध्ये अनेक प्रामाणिक पोलिस अधिकारी आहेत आणि या निर्णयामुळे संपूर्ण पोलिस दलात भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने आरोपींना मृत्यूदंड किंवा पॅरोलशिवाय जन्मठेपेची कमाल शिक्षा देण्याची मागणी केली होती.

ही घटना 19 जून 2020 रोजी घडली होती. लॉकडाऊनदरम्यान दुकान वेळेपेक्षा जास्त वेळ उघडे ठेवल्याच्या आरोपावरून व्यापारी पी. जयराज आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स यांना अटक करण्यात आली होती. त्यांना सथानकुलम पोलिस ठाण्यात नेऊन नंतर न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. काही दिवसांतच दोघांचा मृत्यू झाला.

कुटुंबीयांनी पोलिस कोठडीत मारहाण केल्याचा आरोप केला होता. या घटनेनंतर मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरुवातीची चौकशी सीबी-सीआयडीकडून करण्यात आली, त्यानंतर प्रकरणाची चौकशी CBI कडे सोपवण्यात आली. तपासादरम्यान एक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांसह एकूण 10 जणांना अटक करण्यात आली होती. नंतर या सर्वांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न Tamil Nadu news

आरोपींवर खून, कट रचणे आणि पुरावा नष्ट करणे यांसारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले. तपासा दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज देखील हटवण्यात आले. यामुळे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. तपासादरम्यान आरोपींपैकी एका पोलिस उपनिरीक्षकाचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला. सहा वर्षांनंतर, 2026 मध्ये, मदुराई न्यायालयाने खटल्याची सुनावणी पूर्ण केली. मार्च 2026 मध्ये, सर्व नऊ पोलिसांना खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले.

९ पोलिस कर्मचाऱ्यांची नावे

हा मृत्यू नैसर्गिक मृत्यू असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला. मात्र, हा मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीत मृत्यू झाला हे सिद्ध झाले. 6 एप्रिल 2026 रोजी, मदुराई येथील प्रथम अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने नऊ पोलिसांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. निरीक्षक एस. श्रीधर, उपनिरीक्षक पी. रघु गणेश, के. बालकृष्णन, हेड कॉन्स्टेबल एस. मुरुगन, ए. समिदुराई आणि कॉन्स्टेबल एम. मुथुराज, एस. चेल्लादुराई, एक्स. थॉमस फ्रान्सिस आणि एस. वेलुमुथू अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat