Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Tamilnadu Government : खाजगी शाळांना फीचे फलक लावणे बंधनकारक; तमिळनाडू सरकारने दिले आदेश

Tamilnadu Government : खाजगी शाळांना फीचे फलक लावणे बंधनकारक; तमिळनाडू सरकारने दिले आदेश

Tamil Nadu Government : तमिळनाडू सरकारने सर्व खाजगी शाळांना सरकारने निश्चित केलेल्या शिक्षण शुल्काचा (ट्युशन फी) तपशील आपापल्या सूचना फलकांवर लावणे बंधनकारक (Tamil Nadu Government) करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

अनेक खाजगी शाळा ठरवून दिलेल्या नियमांपेक्षा जास्त प्रमाणात फी वसूल करत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने हे पाऊल उचलले आहे.

राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा ४ जूनपासून (Tamil Nadu Government) पुन्हा सुरू होणार असल्याचे स्पष्ट करत शिक्षण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, जर कोणत्याही खाजगी शाळेने निश्चित केलेल्या रकमेपेक्षा जास्त फी आकारली, तर त्या शाळेची मान्यता रद्द केली जाईल.

तामिळनाडूमध्ये १३,००० हून अधिक मान्यताप्राप्त खाजगी शाळा सुरू असल्याचे सांगत, या अधिकाऱ्याने माहिती दिली की शाळांना पालकांकडून कोणत्याही प्रकारची छुपी प्रवेश फी वसूल न करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. हा नियम तमिळनाडू शाळा दुरुस्ती कायद्याद्वारे अधिक मजबूत करण्यात आला आहे.

या कायद्यांतर्गत, उच्च अधिकारी आणि शिक्षणतज्ञांचा समावेश असलेली एक समिती शाळांची प्रमाणित फी निश्चित करते, असे ते पुढे म्हणाले.तसेच, जर एखादी शाळा नियमांविरुद्ध जाऊन अवाजवी फी वसूल करत असल्याचे आढळल्यास पालक संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवू शकतात, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat