Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Tanvi Taipei Champion : १७ वर्षीय तन्वी शर्माने तैपेई ओपन जिंकून रचला नवा इतिहास! ठरली जगातील सर्वात तरुण चॅम्पियन

Tanvi Taipei Champion : १७ वर्षीय तन्वी शर्माने तैपेई ओपन जिंकून रचला नवा इतिहास! ठरली जगातील सर्वात तरुण चॅम्पियन

Tanvi Sharma Wins Taipei Open Super 300 First BWF World Tour Title : भारताची १७ वर्षीय युवा बॅडमिंटनपटू तन्वी शर्मा (Tanvi Sharma) हिने रविवारी तैपेई ओपन सुपर ३०० (Taipei Open Super 300) चे विजेतेपद पटकावत आपल्या कारकिर्दीतील पहिलेवहिले 'बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर टायटल' (BWF World Tour) जिंकून इतिहास रचला आहे.

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात तन्वीने व्हिएतनामच्या ६ व्या मानांकित थ्यू लिन्ह गुयेन हिचा २१-१६, २१-१६ असा अवघ्या ३६ मिनिटांत सरळ गेममध्ये पराभव केला. या विजयासोबतच ती तैपेई ओपनचे विजेतेपद पटकावणारी जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे.

दोन्ही गेममध्ये आक्रमक वर्चस्व!

सामन्याच्या सुरुवातीपासूनच तन्वीने आक्रमक पवित्रा घेतला. तिचे उत्कृष्ट ड्रॉप शॉट्स आणि क्रॉस-कोर्ट स्मॅशच्या जोरावर तिने पहिला गेम २१-१६ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये व्हिएतनामच्या खेळाडूने ३-० अशी आघाडी घेतली होती, परंतु तन्वीने संयम न गमावता पुनरागमन केले आणि २१-१६ ने दुसरा गेमही जिंकत पहिल्या सीनियर बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर ट्रॉफीवर नाव कोरले.

कोच पार्क ताए-सांग यांच्या गळ्यात घातले ‘गोल्ड’!

ऐतिहासिक विजयानंतर तन्वीने आपले प्रशिक्षक पार्क ताए-सांग (Park Tae-sang) यांच्यासोबत भावुक क्षण शेअर केला. तिने स्वतःचे सुवर्णपदक काढून कोचच्या गळ्यात घातले. दक्षिण कोरियाचे माजी शटलर पार्क ताए-सांग हे यापूर्वी भारताची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधूचेही प्रशिक्षक राहिले आहेत.

– Bumrah Injury Shock : श्रीलंका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह कसोटी मालिकेतून बाहेर?

महान खेळाडू ली योंग डे चा विक्रम मोडला!

१७ वर्षे २२२ दिवस वयात तैपेई ओपनच्या फायनलमध्ये पोहोचून तन्वीने दक्षिण कोरियाचा दिग्गज खेळाडू ली योंग डे चा २० वर्षांपूर्वीचा (२००६) विक्रम मोडला, जो १७ वर्षे २८७ दिवस वयात पुरुष दुहेरीच्या फायनलमध्ये पोहोचला होता. यापूर्वी यूएस ओपन, ओडिशा मास्टर्समध्ये उपविजेती राहिलेली तन्वी आता जागतिक क्रमवारीत टॉप-३५ मध्ये पोहोचली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat