Thursday, 08 Apr, 10.24 pm प्रभात

ताज्या बातम्या
.तर पुन्हा घर विक्रीवर परिणाम होईल - क्रेडाई

नवी दिल्ली - गेल्या वर्षी करोना व्हायरसमुळे आठ मोठ्या शहरातील घरांची विक्री 40 ते 50 टक्‍क्‍यांनी कमी झाली होती. आता ही विक्री वाढून 2019 इतकी होईल अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच काही शहरांमध्ये कररोनाचे रुग्ण वाढत असल्याबद्दल क्रेडाई या उद्योजकांच्या संघटनेने चिंता व्यक्त केली आहे.

करोनाचे रुग्ण वाढून जर लॉक डाऊन वाढवले तर पुन्हा घर विक्रीवर परिणाम होऊ शकतो असे या संघटनेने म्हटले आहे. जानेवारी ते मार्च या काळात भारतातील घरांची विक्री बऱ्यापैकी वाढली आहे. याबद्दल क्रेडाईचे अध्यक्ष हर्षवर्धन पटोडिया यांनी समाधान व्यक्त केले. आगामी काळात ही प्रक्रिया चालू राहील अशी आशा व्यक्त केली. कटोरिया म्हणाले की, जानेवारी ते मार्च दरम्यान घरांची विक्री वाढली आहे. त्यामुळे विकसक आनंदी झाले आहेत. परिस्थिती अशीच राहिली तर पून्हा घर विक्री 2019 इतकी वाढेल.

जानेवारी ते मार्च या काळामध्ये भारतातील काही राज्यांनी मर्यादित काळासाठी मुद्रांक शुल्कात कपात केली होती. त्यामुळे घर विक्री वाढण्यास मदत झाली. मात्र त्यातील काही राज्यांनी ही सवलत कमी केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता या राज्यांनी पुन्हा मुद्रांक शुल्कात कपात करण्याच्या शक्‍यतेवर विचार करावा.

आम्ही केंद्र सरकारकडे बऱ्याच वर्षापासून घरबांधणीला पायाभूत सुविधांचा दर्जा द्यावा अशी मागणी केलेली आहे. आम्ही पुन्हा ती मागणी केंद्र सरकारकडे करीत आहोत. निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांना इनपुट टॅक्‍स क्रेडिट मिळावे. विकसकांना लागणाऱ्या विविध परवानग्या वेगात मिळाव्या यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी काही मदत लागल्यास क्रेडाई केंद्र आणि राज्य सरकारला अशी मदत करण्यास तयार असल्याचे पटोडिया यांनी सांगितले.

क्रेडाईचे सदस्य असलेल्या विकासकांच्या अडीच कोटी कामगारांना करोनाची लस मोफत देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी आम्ही सरकारकडे आवश्‍यक ती परवानगी मागितली आहे असे त्यांनी सांगितले. देशभरातील रिऍल्टी क्षेत्राची परिस्थिती कशी आहे याची माहिती मिळावी यासाठी माहितीचे संकलन डिजिटली करण्याच्या शक्‍यतेवर क्रेडाई विचार करीत आहे. त्यामुळे विकासकाबरोबरच रिऍल्टी क्षेत्रासंबंधातील धोरण तयार करण्यास सरकारला आहे मदत होईल असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top