Wednesday, 23 Sep, 12.16 pm प्रभात

ताज्या बातम्या
टाटा स्कायच्या कार्यक्रमात प्रेम चोप्रा यांचा जीवनप्रवास

पुणे - सहा दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टीत काम केलेल्या प्रेम चोप्रा यांनी सांगितले की, कलाकार कधीच निवृत्त होत नसतो. टाटा स्काय सीनिअर्सवरील 'जिंदगी एक सफर' या कार्यक्रमात ते म्हणाले की, प्रतिभा काही वयावर अवलंबून नसते.

380 सिनेमांमधील वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी प्रेम चोप्रा ओळखले जातात. या अभिनेत्याने खलनायक, नायक, सहकलाकार अशा सर्व प्रकारच्या भूमिका केल्या. 23 सप्टेंबर रोजी ते वयाची 85 वर्षे पूर्ण करत आहेत.

टाटा स्कायवर 505 वर सोमवार ते गुरुवार दुपारी 3 ते सायं.7 या वेळात ही मुलाखत उपलब्ध आहे. टाटा स्काय मोबाइल ऍपवरही संपूर्ण मुलाखत पाहता येईल. फिट राहण्यासाठी ते रोज सकाळी योगा करतात व पोहण्याचा व्यायाम करतात. प्रेम चोप्रा यांनी कवितेवरील आपले प्रेमही व्यक्त केले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top