Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Teacher Protest : राज्यातील तब्बल १० हजार शिक्षक होणार बेरोजगार? कनिष्ठ महाविद्यालयांच्या 'या' निर्णयाविरोधात तीव्र संताप

Teacher Protest : राज्यातील तब्बल १० हजार शिक्षक होणार बेरोजगार? कनिष्ठ महाविद्यालयांच्या 'या' निर्णयाविरोधात तीव्र संताप

प्रभात 2 weeks ago

Teacher Protest - पुणे विभागीय कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या वतीने पुणे विभागीय उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर सोमवारी (दि. १) अकरावी - बारावी ऑनलाईन अन्यायकारक संच मान्यतेची होळी करून निषेध नोंदवला जाणार आहे.

कनिष्ठ महाविद्यालयातील अनुदानित शिक्षकांची राज्यातील साडेआठ ते नऊ हजार पदे अतिरिक्त करणे व कायमस्वरूपी कमी करण्याचा घाट शिक्षण संचलनालय यांनी घातलेला आहे.

हा डाव हाणून पाडण्यासाठी संपूर्ण राज्य विभागाप्रमाणे मोठे आंदोलन उभारण्यात येणार आहे अशी माहिती राज्य महासंघाचे सचिव प्राचार्य लक्ष्मण रोडे व पुणे विभागीय कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे सचिव प्राचार्य विक्रम काळे यांनी दिली. गेली ५० वर्षे कनिष्ठ महाविद्यालयांच्या संच मान्यता विभागीय, प्रांतीय, भौगोलिक अडीअडचणी लक्षात घेऊन शिक्षण तज्ञांनी १९८१ च्या सेवाशर्ती, शाळा संहिता, शिक्षण मंडळाच्या विविध मार्गदर्शक सूचना व परिपत्रके,

तसेच ४ डिसेंबर १९९० ते २४ फेब्रुवारी २००९ या दरम्यान निर्देशित केलेले आठ व इतर शासनादेश, या माध्यमातून आजपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित व शिक्षकांचा कार्यभार हा शाखा, तुकडी, विद्यार्थी संख्या, तासिकांचा कालावधी या माध्यमातून शिक्षक संख्या निश्चित केली जात आहे. मात्र शिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांनी आपल्या मनमानी पद्धतीने प्रचलित निकषांना खोडा घालून अत्यंत चुकीचा व विद्यार्थी तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांवर अन्याय करणारा संच मान्यतेचा मसुदा २७ मे २०२६ रोजी जाहीर केला आहे.

या अन्यायकारक मसुद्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असून राज्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधी हिरावून घेतल्या जाणार आहेत. तसेच हजारो कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक हे अतिरिक्त होणार आहेत. सुमारे आठ ते दहा हजार शिक्षकांची संख्या कमी केली आहे. संच मान्यतेच्या ह्या नवीन अन्यायकारक मसुद्याचा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने निषेध केला आहे.

या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच संच मान्यता या प्रचलित पद्धतीनेच व्हाव्या यासाठी राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या अस्तित्वासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आपल्या विभागातील शिक्षण उपसंचालक कार्यालयावर सोमवारी (दि. १) सकाळी ११ वाजता या अन्यायकारक संच मान्यतेच्या मसुद्याची होळी करणार असल्याचे विक्रम काळे यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat