Saturday, 23 Jan, 10.34 pm प्रभात

ताज्या बातम्या
Terror Funding: हाफिझ सईदच्या तिघा साथीदारांना 'तुरुंगवास'

लाहोर - मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिझ सईद याच्या जमात उद दावा या संघटनेच्या तीन म्होरक्‍यांना पाकिस्तानातील दहशतवाद विरोधी न्यायालयाने दहशतवादाला अर्थसहाय्य करण्याच्या आरोपावरून सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

सईदचा मेव्हणा हाफिज अब्दुर रहमान मक्की, जमात्‌ उद दावाचा प्रवक्ता याह्या मुजाहिद आणि जफर इक्‍बाल या प्रत्येकाला लाहोरमधील दहशतवाद विरोधी न्यायालयाने सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. शुक्रवारी सुनाव्ण्यात आलेल्या शिक्षेमुळे मुजाहिद आणि इक्‍बाल यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा कालावधी अनुक्रमे 80 आणि 56 वर्षे झाला आहे.

झाआआआआअफ्र इक्‍बाल, अब्दुल रेहमान मक्की आणि याह्या मुजाहिद यांच्याविरोधात 2019 मध्ये दाखल केलेल्या प्रकरणी ही शिक्षा सुनावली गेली. दहशतवाद विरोधी विभागाने 'जेयुडी'च्या अनेक म्होरक्‍यांविरोधात पंजाब प्रांतातील विविध शहरंमध्ये दहशतवादाशी संबंधित तब्बल 41 प्रकरणे दाखल केली आहेत्‌. त्यापैकी 37 प्रकरणांवर आतापर्यंत सत्र न्यायालयाने निकाल सुनावला आहे.

अगदी अलिकडे लष्कर ए तोयबाचा म्होरक्‍या झकिउर रेहमान याला 'टेरर फंडिंग'च्या तीन आरोपात दोषी ठरवून 15 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तर दहशतवाद विरोधी न्यायालयाने 'टेरर फंडिंग'च्या अन्य प्रकरणात इक्‍बाल आणि मुजाहिद यांना 14 वर्षे आणि मक्की याला 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षाही सुनावण्यात अली आहे. तर 'एटीसी'ने आतापर्यंत पाच प्रकरणात हाफिझ सईदला दहशतवादाच्या अर्थसहाय्याच्या पाच आरोपात 36 वर्षांच्या सामूहिक कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top