Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Thackeray Group BJP Alliance : अखेर ठाकरेंच्या शिवसेनेची अन् भाजपची युती? घडामोडींचा वेग

Thackeray Group BJP Alliance : अखेर ठाकरेंच्या शिवसेनेची अन् भाजपची युती? घडामोडींचा वेग

प्रभात 6 months ago

Thackeray Group BJP Alliance : याठिकाणी भाजप आणि ठाकरेसेना पक्ष एकत्रित आल्याचे दिसू शकते, असे चंद्रपूरचे ठाकरेसेना जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

संदीप गिऱ्हे म्हणाले, आमची स्वाभाविक चॉईस काँग्रेस आहे. मात्र, काँग्रेसला आम्हाला सोबत घ्यायचे आहे का? त्यांची वागणूक पाहून असा प्रश्न आमच्या मनात निर्माण झाला आहे. ठाकरेसेना पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या 8 नगरसेवकांनी गट नोंदवला असून, आणखी 2 नगरसेवक आमच्या सोबत आहे.

त्यामुळे जो ठाकरेसेनेचा महापौर करेल, त्यांना आमच्या 10 नगरसेवकांचा पाठिंबा देऊ. आम्हाला भाजप आणि काँग्रेस दोघांनीच पाठिंब्यासाठी संपर्क केले आहे. काँग्रेसमधून विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क झाला आहे. तर, धानोरकर गटाने अजूनही संपर्क केलेले नाही.

दरम्यान, आमची पण इच्छा काँग्रेस सोबत जायची होती. आम्ही निवडणुकीपूर्वीही त्यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र त्यांनी दाद दिली नाही. त्यांना निवडणुकीच्या पूर्वीपासून आमची गरज नव्हती. त्यामुळे आता निवडणुकीनंतर त्यांना खरच आमची गरज असेल का? असा आमच्या समोरचा प्रश्न आहे.

काँग्रेसच्या भूमिकेमुळे स्थानिक पातळीवर वेगळा निर्णय करण्याचा आता आम्हाला अधिकार आहे, असे आम्ही समजतो. भाजपसोबत आमचे काय निर्णय होऊ शकतो, त्या संदर्भात एक ते दोन दिवसात निर्णय समोर येईल.

जर काँग्रेसने ठाकरेसेनेला महापौर देण्यासंदर्भात जाहीर केले, तर आम्ही काँग्रेस सोबत जाऊ, मात्र सध्या ते गटातटाच्या राजकारणामध्येच व्यस्त असल्याचेही जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat