Sunday, 06 Oct, 7.22 am प्रभात

मुखपृष्ठ
तिकिट डावलल्याने शेकापचे भाऊसाहेब रूपनर शिवसेनेत दाखल

सोलापूर (प्रतिनिधी) - सांगोला विधानसभा मतदारसंघात तिकिट जाहीर होवूनही ऐनवेळी उमेदवारी नाकारली गेल्याने शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिट डावलल्याने शेकापचे भाऊसाहेब रूपनर शिवसेनेत दाखलयाचा फायदा शहाजीबापू पाटील यांना होईल, असे एकंदरीत चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.

भाई आमदार गणपतराव देशमुख यांनी विधानसभा न लढविण्याचा निर्णय घेतल्याने यंदा शेकापच्या समितीने पाच इच्छुकांच्या मुलाखती घेवून भाऊसाहेब रूपनर यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र नंतर कार्यकर्त्यांचा आग्रह व नाराजी पाहून पक्षाने आमदार देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांचे नाव जाहीर केले. यामुळे नाराज झालेल्या भाऊसाहेब रूपनर यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. शिवसेना जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शनिवारी मातोश्रीवर जावून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन हाती बांधून घेतले.

दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाचा गड असणाऱ्या सांगोला मतदारसंघातील भाऊसाहेब रूपनर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण झाले असून आता मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे. 55 वर्षे ज्या मतदारसंघाचे नेतृत्व आजोबांनी केले आहे, तेथे आता नातवाची राजकीय इनिंग सुरू होत आहे.

आमदार देशमुख निवडणूक रिंगणात नसल्याने विरोधकांनी ही मोठी तयारी केली असून सर्वाधिक मातब्बर उमेदवारांनी फॉर्म भरले आहेत. आमदार भाई देशमुख यांना सतत आव्हान देणारे शहाजीबापू पाटील शिवसेनेकडून, तर गेले अनेक वर्षे देशमुखांबरोबर काम करणारे राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे यांनी आपआपली उमेदवारी दाखल केली आहे. भाजपाच्या राजश्री नागणे यांनीही अर्ज भरला आहे. याच बरोबर अनेक पक्षांचे उमेदवार येथे रिंगणात उतरले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>