Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
टोकियो ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धेतील ड्रॉ जाहीर

टोकियो ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धेतील ड्रॉ जाहीर

प्रभात 5 years ago

बर्लिन -टोकियो ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धेतील ड्रॉची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या ड्रॉमध्ये यजमान जपानने पुरुष गटात अ गटात स्थान मिळविले आहे. पुरुष विभागात एकूण 16 संघ असून प्रत्येक चार संघांचे चार गट तयार करण्यात आले आहेत.

जपानसह दक्षिण आफ्रिका, मेक्‍सिको आणि फ्रान्स आदी संघ गट 'अ'मध्ये आहेत. तसेच गट 'ब'मध्ये न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, होंडुरास, रोमानिया, तर गट 'क'मध्ये इजिप्त, स्पेन, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आदी संघ आहेत. चौथ्या म्हणजे गट 'ड'मध्ये ब्राझील, जर्मनी, आयव्हरी कोस्ट आणि सौदी अरेबिया संघाचा समावेश आहे.

दुसरीकडे महिला गटात एकूण 12 संघ सहभागी होत असून प्रत्येकी चार संघ हे तीन गटात विभागले आहेत.

यजमान जपानसह कॅनडा, ब्रिटन आणि चिली संघाला गट 'अ'मध्ये स्थान देण्यात आले आहे. गट 'ब'मध्ये चीन, ब्राझील, झांबिया, नेदरलॅंड्‌स, तर गट 'क'मध्ये स्वीडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघ खेळणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat