Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Trisha Krishnan: मिस मद्रास ते दाक्षिणात्य सिनेसृष्टीची 'क्वीन'; त्रिशा कृष्णन पुन्हा चर्चेत, थलपती विजयसोबत अफेअरच्या चर्चा

Trisha Krishnan: मिस मद्रास ते दाक्षिणात्य सिनेसृष्टीची 'क्वीन'; त्रिशा कृष्णन पुन्हा चर्चेत, थलपती विजयसोबत अफेअरच्या चर्चा

प्रभात 3 months ago

Trisha Krishnan: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन (Trisha Krishnan ) सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तमिळ सुपरस्टार थलपती विजय याच्या वैयक्तिक आयुष्याशी तिचं नाव जोडलं जात असल्यामुळे सोशल मीडियावर आणि मनोरंजन विश्वात अनेक चर्चा रंगल्या आहेत.

विजयच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केल्याची बातमी समोर आल्यानंतर या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.

त्रिशा कृष्णनचा जन्म ४ मे १९८३ रोजी चेन्नई येथे झाला. तिने चेन्नईतील एथिराज कॉलेजमधून बीबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्रिशाने मॉडेलिंगमध्ये आपली ओळख निर्माण केली. १९९९ साली तिने 'मिस मद्रास' हा किताब जिंकला आणि तिथूनच तिच्या करिअरला वेगळी दिशा मिळाली.

त्रिशाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या भूमिकेतून केली. १९९९ मध्ये आलेल्या 'जोडी' या चित्रपटात ती झळकली होती. त्यानंतर २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मौनम पेसियाधे' या चित्रपटातून ती मुख्य अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांसमोर आली. या चित्रपटानंतर त्रिशाला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळू लागली. Trisha Krishnan

यानंतर तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. 'घिल्ली' या चित्रपटात तिने थलपती विजयसोबत काम केले होते आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर 'तिरुपाची', 'आथी', 'कुरुवी' आणि अलीकडील 'लिओ' या चित्रपटांमध्येही विजय आणि त्रिशा एकत्र दिसले. काही काळ त्यांनी एकत्र काम केले नव्हते, मात्र 'लिओ'नंतर दोघांबद्दलच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली.

त्रिशाला '९६' या चित्रपटातील 'जानू' या भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. तसेच 'पोन्नियिन सेल्वन १' आणि 'पोन्नियिन सेल्वन २' या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये तिने साकारलेली राजकुमारीची भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडली. अभिनयासोबतच तिच्या व्यक्तिमत्त्वामुळेही ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. त्रिशाने हिंदी चित्रपटसृष्टीतही पाऊल ठेवले आहे. तिने अभिनेता अक्षय कुमारसोबत 'खट्टा मीठा' या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्रिशा सध्या ४२ वर्षांची आहे आणि अजूनही अविवाहित आहे. २०१५ साली तिचा बिझनेसमन वरुण मनियन याच्याशी साखरपुडा झाला होता. मात्र काही कारणांमुळे हा साखरपुडा मोडला. तसेच तिचं नाव अभिनेता राणा दग्गुबाती याच्याशीही जोडले गेले होते.

दरम्यान, थलपती विजयच्या पत्नी संगीता सोर्नालिंगम हिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करत विजयचे एका अभिनेत्रीशी अफेअर असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांनंतर काही दिवसांतच विजय आणि त्रिशा एका लग्नाच्या रिसेप्शनला एकत्र दिसले. दोघांनी एकसारखे कपडे घातले होते, त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना अधिक उधाण आले.

मात्र या सगळ्या चर्चांवर अद्याप थलपती विजय किंवा त्रिशा कृष्णन यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या अफेअरच्या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat