Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Tukaram Mundhe : मोठी बातमी..! तुकाराम मुंढेंची स्वारगेटमधील हॉटेल्स, टपऱ्यांवर अचानक धाड; विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Tukaram Mundhe : मोठी बातमी..! तुकाराम मुंढेंची स्वारगेटमधील हॉटेल्स, टपऱ्यांवर अचानक धाड; विक्रेत्यांचे धाबे दणाणले

प्रभात 2 months ago

Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील स्वारगेट परिसरात शनिवारी मोठी धडक कारवाई करण्यात आली. स्वारगेट बस स्थानक आणि परिसरातील हॉटेल्स, खाद्यपदार्थांच्या टपऱ्या तसेच विविध विक्री केंद्रांवर अचानक छापे टाकण्यात आल्याने विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

(Tukaram Mundhe)

मिळालेल्या माहितीनुसार, एफडीएचे विशेष पथक सायंकाळी सुमारे ५ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तासह पथकाने स्वारगेट बस स्थानक परिसरातील खाद्य व्यवसायांवर अचानक तपासणी मोहीम सुरू केली. (Tukaram Mundhe)

अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छतेची तपासणी

कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी विविध हॉटेल्स आणि दुकानांमधील अन्नपदार्थांचा दर्जा, साठवणूक व्यवस्था, स्वच्छता आणि परवान्यांची तपासणी केली. अनेक ठिकाणी अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन आढळल्याने संबंधित व्यावसायिकांना कडक समज देण्यात आली. (Tukaram Mundhe)

दुकाने बंद ठेवण्याचे आदेश

ज्या दुकानांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या, त्यांना तात्काळ स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात आले. “दुकान आणि परिसराची संपूर्ण स्वच्छता होईपर्यंत व्यवसाय सुरू करू नये,” असे निर्देश एफडीएच्या पथकाने दिले. काही ठिकाणी दुकाने रिकामी करून घेण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. (Tukaram Mundhe)

मुंढेंच्या धडक मोहिमेचा पुण्यात धसका

अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ, अवैध गुटखा व्यवसाय आणि नियमबाह्य खाद्य व्यवसायांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वारगेटमधील या कारवाईनंतर पुण्यातील इतर खाद्य व्यवसायिकांमध्येही मोठी धास्ती निर्माण झाली असून, अनेकांनी स्वच्छता आणि नियमपालनाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. (Tukaram Mundhe)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat