Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तुम्ही जिम सुरु करा ?

तुम्ही जिम सुरु करा ?

प्रभात 5 years ago

मुंबई - करोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडऊनमध्ये सरकारने जिम आनि फिटनेस सेंटरवर बंदी घातली होती. त्यामुळे जिम आणि फिटनेस सेंटर व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याच मुद्यावरून राज ठाकरे आपली रोकठोक भूमिका मांडली आहे. या संदर्भातील वृत्त एका मराठी वृत्त वाहिनीने दिले आहे.

जिम आणि फिटनेस सेंटर व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असल्या संदर्भात मालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे म्हणाले,'तुम्ही जिम सुरु करा, किती दिवस लॉकडाउनमध्ये काढणार आहात? असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिम चालकांना जिम सुरु करण्याचे आवाहन केले.

राज्य सरकारने अजूनही जिम चालकांना जिम सुरु करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून या व्यवसायाशी संबंधित असलेले लोक राज्यात आंदोलन करत आहेत.

जिम व्यवसायाशी संबंधित असलेल्या अनेकांचा गंभीर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज जिम चालक आणि मालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat