Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
TVK: तामिळनाडूत महिलांसाठी 'सुवर्ण' घोषणा ; विजय सरकारचा मोठा 'मास्टरस्ट्रोक'

TVK: तामिळनाडूत महिलांसाठी 'सुवर्ण' घोषणा ; विजय सरकारचा मोठा 'मास्टरस्ट्रोक'

प्रभात 2 weeks ago

TVK: तामिळनाडूच्या विजय सरकारने 2026-27 च्या अर्थसंकल्पात महिलांना मोठी भेट दिली आहे. अर्थसंकल्पात 'ब्रदर्स गिफ्ट स्कीम' अंतर्गत महिलांसाठी 8 ग्रॅम सोन्याचे नाणे आणि सिल्क साडी योजनेसाठी 812 कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

सीएम विजय यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महिलांना लग्नानिमित्त भेटवस्तू देण्याचे आश्वासन दिले होते. आता अर्थसंकल्पात यासाठी घोषणा करण्यात आली आहे.

तामिळनाडूच्या अर्थमंत्री एन मेरी विल्सन यांनी बुधवारी विधानसभेत TVK सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. विल्सन यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांचे कौतुक केले आणि त्यांनी निविदेतील काही पक्षांना आणि लोकांना दिलेला ‘कट’ (कमिशन) थांबवला असल्याचे सांगितले.

हज सबसिडी वाढली TVK:

ते म्हणाले की, राज्याला ‘आर्थिक संकटातून’ सोडवण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. एन. मेरी विल्सन यांनी सांगितले की, पहिल्यांदाच हजला जाणाऱ्या लोकांसाठी अनुदान 25,000 रुपयांवरून 35,000 रुपये केले जाईल.

ख्रिश्चन आणि मुस्लिम महिला कल्याणकारी संघटनांना मदत करण्यासाठी 1.05 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पाच ख्रिश्चन आणि मुस्लिम स्मशानभूमींच्या विकासासाठी 34 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

त्यांनी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (NEET) रद्द करण्याची मागणी केली. विल्सन यांनी केंद्र सरकारला 12वीच्या गुणांवर आधारित प्रवेशाची जुनी पद्धत पुनर्संचयित करण्याची विनंती केली.

AI साठी सरकारी योजना TVK:

डॉ. एन. मेरी विल्सन म्हणाल्या, “ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून तमिळनाडूला आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये सर्वोच्च पातळीवर नेण्याच्या उद्देशाने राज्यभरात 10 ‘ऑलिम्पिक सेंटर ऑफ एक्सलन्स’ तयार करण्यासाठी 5.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.”

AI वर भर देताना, तामिळनाडूचे अर्थमंत्री म्हणाले की 2031 पर्यंत, राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालये, पॉलिटेक्निक महाविद्यालये आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITIs) मध्ये शिकत असलेल्या 5 लाख विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat