Dailyhunt
Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसले रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल; प्रकृतीची मोठी माहिती समोर

Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसले रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल; प्रकृतीची मोठी माहिती समोर

प्रभात 2 weeks ago

Udayanraje Bhosale : सातारचे खासदार आणि छत्रपती घराण्याचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांना प्रकृती अस्वस्थतेमुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात येत होत्या.

तपासण्यांचे अहवाल आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

रुबी हॉल क्लिनिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उदयनराजे भोसले यांची प्रकृती सध्या स्थिर असून चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून, आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येत आहेत. Udayanraje Bhosale

दरम्यान, त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून विचारपूस सुरू झाली आहे. अनेकांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

डॉक्टरांकडून पुढील काही दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असून, प्रकृतीत सुधारणा होताच त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. Udayanraje Bhosale

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat