Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
उरुळी कांचनला 2 दिवसांत 17 बाधित

उरुळी कांचनला 2 दिवसांत 17 बाधित

प्रभात 6 years ago

सोरतापवाडी -उरुळी कांचन येथे 19 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सोनवणे यांनी दिली. सोरतापवाडी येथे एका 27 वर्षीय तरुणाचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. मेहबुब लुकडे यांनी दिली.

उरुळी कांचन येथील 40 वर्षीय पुरुष व 13 वर्षीय मुलगा व 25,68,42,30 वर्षीय महिला यांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 25 वर्षीय महिला सोडून सर्वजण संपर्कातील आहेत. रविवारी 12 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आत्तापर्यंत उरुळी कांचन येथे 152 रुग्ण झाले असून 108 जणांनी करोनावर मात केली आहे.

43 जण उपचार घेत आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.

रूग्णांच्या संपर्कातील 11 जणांना होमक्वारंटाइन करण्यात आले आहे. 12 रुग्णांपैकी 4 रुग्णांना प्रयागधाम हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवले असून 5 रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये तर 3 रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. बांधितांच्या संपर्कामुळे उरुळी कांचन येथील रुग्ण वाढत आहेत. नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळावे, असे आवाहन सरपंच राजश्री वनारसे यांनी केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat