Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
US attack : नाकाबंदी तोडण्याच्या प्रयत्नातील जहाजावर अमेरिकेचा हल्ला

US attack : नाकाबंदी तोडण्याच्या प्रयत्नातील जहाजावर अमेरिकेचा हल्ला

प्रभात 2 weeks ago

US attack - इराणच्या बंदरांची नाकाबंदी तोडण्याच्या प्रयत्नातील एका जहाजावर अमेरिकेने हल्ला केला असून हे जहाज थांबवून इंजिन निकामी करण्यात आले आहे, असे अमेरिकेच्या सैन्यदलाने म्हटले आहे.

गाम्बियाचा ध्वज असलेल्या लियान स्टार या मालवाहू जहाजाने इराणी बंदरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. रात्रभर अमेरिकी सैन्याने दिलेल्या अनेक इशाऱ्यांकडे या जहाजाने दुर्लक्ष केले होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

ओमानच्या आखातात अमेरिकी विमानांनी जहाज निकामी केले असून ते तिथेच भरकटत आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, अमेरिकी सैन्याने जहाजावर प्रवेश केलेला नाही, असेही त्यांनी पुढे सांगितले.

अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या या ताज्या कारवाईमुळे नाकेबंदी भेदण्याचा प्रयत्न करणारी सहा जहाजे अमेरिकेने रोखली आहेत. एका जहाजाला पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली.

दिनांक २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात युद्ध सुरू केल्यानंतर इराणने सामुद्रधुनी बंद केल्याच्या प्रत्युत्तरात अमेरिकेने १७ एप्रिल रोजी नाकेबंदी सुरू केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat