Dailyhunt
US Iran War: ट्रम्प यांच्या धमकीला इराणचे प्रत्युत्तर ; होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी ठेवली 'ही' अट, भारताचे वाढणार टेन्शन

US Iran War: ट्रम्प यांच्या धमकीला इराणचे प्रत्युत्तर ; होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी ठेवली 'ही' अट, भारताचे वाढणार टेन्शन

प्रभात 2 weeks ago

US Iran War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी मुदत दिली आहे. त्यांनी, 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी इराणकडे मंगळवार संध्याकाळपर्यंतची मुदत आहे.

जर ते असे करण्यात अयशस्वी ठरले, तर त्यांचे वीज प्रकल्प आणि पूल नष्ट केले जातील” अशी थेट धमकीच त्यांनी दिली आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला धमकी दिली. मात्र, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या धमकीचा इराणवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी इराणने अमेरिकेसमोर एक महत्त्वपूर्ण अट ठेवली आहे.

इराणने कोणती अट ठेवली? US Iran War

इराणच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयातील अधिकारी मेहदी तबातबाई यांनी ट्रम्प यांच्या धमक्यांना उत्तर देताना, “जर वाहतूक शुल्काचा काही भाग युद्धातील नुकसानीची भरपाई करण्यासाठी वापरला गेला, तरच होर्मुझची सामुद्रधुनी उघडली जाईल” अशी महत्वाची अट घातली आहे.

इराणचे सभापती गालिबाफ यांचा अमेरिकेला इशारा US Iran War

इराणच्या संसदेचे सभापती गालिबाफ यांनी ट्रम्प यांना, “त्यांच्या अविचारी कृतीमुळे संपूर्ण प्रदेश आगीच्या भक्ष्यस्थानी पडेल” असा इशारा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, “तुमच्या बेजबाबदार कृती अमेरिकेतील प्रत्येक कुटुंबाला जिवंत नरकात ओढत आहेत आणि नेतन्याहूंच्या आदेशांचे पालन करण्याच्या तुमच्या आग्रहामुळे आपला संपूर्ण प्रदेश जळून खाक होईल.”

ट्रम्प यांनी इराणला अल्टिमेटम दिला US Iran War

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अल्टिमेटम देत, जर त्यांनी मंगळवार संध्याकाळपर्यंत कारवाई केली नाही, तर त्यांच्याकडे कोणतेही वीज प्रकल्प किंवा सुरक्षित पूल शिल्लक राहणार नाहीत.अशी धमकी दिली. त्यांनी ट्रुथसोशलवर पोस्ट करून अमेरिका इराणवर मोठा हल्ला कधी करेल हे देखील सूचित केले. ट्रम्प यांनी लिहिले, “मंगळवारी रात्री ८ वाजता ईस्टर्न टाईम (भारतीय वेळेनुसार बुधवार सकाळी).”

ट्रम्प यांनी कराराची आशा व्यक्त केली US Iran War

ट्रम्प यांनी अशी आशाही व्यक्त केली की सोमवारपर्यंत इराणसोबत करार होऊ शकतो. फॉक्स न्यूजशी बोलताना ते म्हणाले, “मला वाटते की सोमवार ही एक चांगली संधी आहे, ते सध्या वाटाघाटी करत आहेत. जर त्यांनी करार केला नाही, तर मी सर्व काही उडवून देण्याचा आणि तेल ताब्यात घेण्याचा विचार करेन.”

ट्रम्प यांनी यापूर्वी इराणवर टीका करताना म्हटले होते, “मंगळवारी इराणमध्ये वीज प्रकल्प दिन आणि पूल दिन एकाच वेळी साजरा केला जाईल. असे यापूर्वी कधीही घडले नाही!!! तुम्ही वेडे लोक आहात! होर्मुझची सामुद्रधुनी उघडा नाहीतर तुम्ही नरकात जाल – फक्त सावध रहा! अल्लाहकडे प्रार्थना करा.”

भारतातील तणाव वाढणार! US Iran War:

सध्या भारतात तेलाचे संकट नसले तरी, एलपीजीचा पुरवठा एक आव्हान बनून राहिला आहे. सरकारने यासाठी एक योजना तयार केली असून एलपीजी ग्राहकांना पीएनजीकडे वळवण्यावर सातत्याने लक्ष केंद्रित करत आहे.

५ एप्रिल रोजी सरकारने जाहीर केले की, गेल्या महिन्यात सुमारे ८००,००० ग्राहक पीएनजीकडे वळले आहेत. याशिवाय, मध्य पूर्वेकडून येणाऱ्या युरिया आणि डीएपीच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. जर होर्मुझची सामुद्रधुनी लवकर उघडली नाही, तर खतांचे संकटही निर्माण होऊ शकते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat