Dailyhunt
us-iran-war: "अमेरिका-इस्रायल संबंध तोडण्याचे वचन."; ट्रम्प यांनी प्रस्ताव फेटाळल्यानंतर तेहरानचा इशारा

us-iran-war: "अमेरिका-इस्रायल संबंध तोडण्याचे वचन."; ट्रम्प यांनी प्रस्ताव फेटाळल्यानंतर तेहरानचा इशारा

Us-iran-war: अमेरिका आणि इराण यांच्यातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, तेहरानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते, इस्माईल बघाई यांनी एक महत्त्वपूर्ण निवेदन जारी करून चर्चेतून तात्काळ निकालांची अपेक्षा करू नये, असे स्पष्टपणे म्हटले आहे.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी अलीकडेच एका सरकारी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत, तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांतर्गत अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

बघाई यांनी उघडपणे इशारा दिला की, अमेरिकेसोबत सुरू असलेल्या चर्चेतून कोणताही तात्काळ किंवा जलद बदल अपेक्षित करणे ‘अवाजवी’ आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे, लवकरच एखादा मोठा करार होईल किंवा तणाव कमी होईल, या अटकळांना पूर्णविराम मिळाला.

पाकिस्तानची प्रशंसा us-iran-war:

या राजनैतिक प्रयत्नांमध्ये पाकिस्तानच्या भूमिकेवर इराणने विश्वास व्यक्त केला. बघाई यांनी, “पाकिस्तान एक विश्वासार्ह मध्यस्थ राहील” असे सांगितले. त्यांनी पाकिस्तानच्या प्रयत्नांची प्रशंसा करत म्हटले, “पाकिस्तानने आतापर्यंत चांगले काम केले आहे आणि या कठीण वाटाघाटी हाताळण्याची उत्कृष्ट क्षमता दाखवली आहे.”

अमेरिका आणि इस्रायलवरील इराणचा अविश्वास पुन्हा व्यक्त करत बघाई यांनी, “हे दोन्ही देश “वचने मोडण्यासाठी ओळखले जातात.” त्यांनी यावर जोर दिला की, “इराण कोणत्याही लेखी करारावर किंवा अमेरिका-इस्रायलच्या आश्वासनांवर विश्वास ठेवत नाही, त्याचा विश्वास आहे की खरी सुरक्षा केवळ स्वतःच्या लष्कराच्या आणि शस्त्रास्त्रांच्या सामर्थ्यानेच मिळवता येते.” असे म्हणाले.

अमेरिकेच्या वक्तव्यांबद्दल ते काय म्हणाले?

बघाई यांनी सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमधून येणाऱ्या अमेरिकेच्या वक्तव्यांवरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “अमेरिकेच्या नेत्यांचे ट्विट्स किंवा वक्तव्ये फार गांभीर्याने घेऊ नका, तसेच त्यांना अतिरंजित करून त्यातून कोणताही गहन अर्थ काढू नका. त्यांची वक्तव्ये लगेचच खरी मानली जाऊ नयेत. ती सत्य असतीलच किंवा तेच त्यांचे वास्तविक धोरण असेलच असे नाही.”

“कायमस्वरूपी शांतता हे इराणचे ध्येय ” us-iran-war:

बघाई यांनी स्पष्ट केले की, इराणचे ध्येय केवळ वाटाघाटी करणे नाही, तर “युद्धाचा धोका पूर्णपणे नाहीसा होईल” अशी परिस्थिती निर्माण करणे आहे. त्यांनी पुढे सांगितले की, “तेहरान कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही किंवा कोणत्याही गोष्टीसाठी घाई करणार नाही. चर्चेची गती आणि दिशा स्वतःच्या नियंत्रणाखाली राहील, हे सुनिश्चित करण्यावर आमचे लक्ष आहे.”

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat