Monday, 25 May, 2.18 pm प्रभात

ठळक बातम्या
वाकेश्वरात वाळू अडड्यावर छापा; 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

एलसीबीची धडाकेबाज कारवाई; सहाजणांना अटक, कारवाईने खळबळ
सातारा/वडूज, दि. 25 (प्रतिनिधी)
वाकेश्वर (ता. खटाव) येथे सुरू असलेल्या वाळूच्या अवैध उपशावर स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी सकाळी सहा वाजता छापा टाकला.यावेळी पोलिसांनी जेसीबी,डंपर असा 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करून सहाजणांना अटक केली आहे. या कारवाईने खटाव तालुक्‍यातील वाळू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. खटाव तालुक्‍यातील यंत्रणेला कसलाही मागमुस न लागता एलसीबीने इतकी मोठी कारवाई केल्याने कर्तव्यदक्ष डीवायएसपींच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

महेश शशिकांत हिरवे (वय 21 रा. कुरवली ता. खटाव),गौरव आनंदराव पवार (वय 28 रा. उंबर्डे ता. खटाव), योगेश सुरेश राऊत (वय 22 रा. सातेवाडी ता. खटाव), आकाश सुभाष गोडसे (वय 23 रा. कुरवली फाटा ता. खटाव), श्रीकांत विठ्ठल बनसोडे (वय 42 रा. नाथमंदिर वडूज ता. खटाव ),मंगेश मधुकर मोहिते (वय 25 रा. सजगणे वस्ती वडूज ता. खटाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, खटाव व माण तालुक्‍यात अवैध वाळूची लूट केली जात असल्याने प्रभात'ने वेळोवेळी आवाज उठवला होता. त्याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दोन्ही तालुक्‍यातील वाळूची लुट थांबवून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.

वाकेश्वर येथे वाळूचा उपसा होत असल्याची माहिती दि. 24 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना कारवाईच्या सुचना दिल्या होत्या.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, हवालदार तानाजी माने, रामा गुरव, शरद बेबले, प्रवीण फडतरे, राजू ननावरे, अजित कर्णे, अर्जुन शिरतोडे, विक्रम पिसाळ, विशाल पवार, गणेश कचरे, वैभव सावंत यांनी केली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top